साकोली : मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जांभळी सडक येथे राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी जांभळी सडक गावात विद्यार्थ्यांची मतदार जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले व विद्यालयात रांगोळी स्पर्धा व भावगीत स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेमध्ये ४६ विद्यार्थी सहभागी झाले. त्यात अभिषेक उत्तम बंसोड प्रथम, प्राची देशपांडे द्वितीय, कल्याणी पात्रीकर तृतीय, सायली रामटेके प्रोत्साहनपर, पायल रोशन मेश्राम प्रोत्साहनपर विजेते यशस्वी ठरले.भावगीत स्पर्धेमध्ये प्रीती बोरकर, सुबोध बोरकर, मयुर तिरपुडे. भावगीत स्पर्धेत विजेते स्पर्धक ठरले. मतदार जागृती फेरीचे नेतृत्व डी.बी. वरणे व तिरपुडे, बी.एम. टेंभुर्णे, एस.ए. हटवार यांनी केले. रांगोळी स्पर्धेचे आयोजन आर.जी. कापगते तर भावगीत स्पर्धेचे आयोजन एस.एस. हटवार, ए. के. बावणे, एस.एस. कुलसुंगे, सर्व शिक्षक वृद्धांनी सहकार्याने केले. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात
By admin | Updated: January 28, 2016 00:35 IST