शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:16 IST

थील ज.मु. पटेल पटेल महाविद्यालयात युजीसी प्रायोजित व महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण विभागातर्फे

ठळक मुद्देस्पोर्टस् बायो मेकॅनिक्स विषय : अमरावती विद्यापिठाच्या कुलगुरूंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील ज.मु. पटेल पटेल महाविद्यालयात युजीसी प्रायोजित व महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘स्पोर्टस बायो मेकॅनिक्स लेटेस्ट ट्रेन्डस अ‍ॅप्रोच अ‍ॅन्ड अप्लिकेशन’ या विषयावर राष्टÑीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.परिसंवादाचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते पार पडले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी आपल्या देशात खेळाची संस्कृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. समाजाच्या आणि देशाच्या स्वास्थासाठी खेळाची भूमिका फार महत्वाची आहे, असे ते म्हणाले. विद्यापिठाकडून दिल्या जाणाºया वाढीव गुणांच्या पलिकडे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी खेळाला महत्व द्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.परिसंवादाला संबोधित करताना ज.मु. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी स्वागतपर भाषणातून, खेळ हा तणाव मुक्तीवर सर्वाेत्तम उपाय असल्याचे सांगितले. खेळात प्राविण्य व नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही यशस्वी होतात, असे त्यांनी नमुद केले.एलएनआपीई ग्वालीयरच्या स्पोर्टस् बायोमेकानिक्सचे विभाग प्रमुख डॉ. अरविंद साजवान यांचे बिजभाषण झाले. आपल्या बिजभाषणात त्यांनी स्पोर्टस बायो मेकॅनिक्सच्या क्षेत्रातील बदलत्या विविध प्रवाहांचे विवेचन केले. तदवतच खेळाडूची प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी स्पोर्टस बायो मेकॅनिक्सची कशी आवश्यकता हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगितले. डॉ. कल्पना जाधव यांनी समयोचित विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अंनिलकुमार करवंदे आणि डॉ. माधवी मार्डीकर यांचीही यावेळी प्रभावी भाषणे झालीत.परिंसंवादाच्या आयएसबीन क्रमांक असलेल्या शोधनिबंध स्मरणीकेचे व महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. विनी ढोमणे लिखित ‘स्वातंत्र्योत्तर हिंदी आत्मकथाओंमें सामाजिक मुल्य’ या पुस्तकाचे अतिथीच्या हस्ते विमोचन करण्यात आले. परिसंवादाचे संयोजक डॉ. बी.एस. पवार यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. रोमी बिश्त यांनी आभार प्रदर्शन केले. संचलन डॉ. उमेश बन्सोड, डॉ. अपर्णा यादव, डॉ. विणा महाजन यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. अमोल पदवाड डॉ. डी.एच. राऊत, डॉ. कार्तिक पनिकर, डॉ. प्रदिप मेश्राम, डॉ. आनंद मुळे, डॉ. सलिल बोरकर, डॉ. प्रकाश सिंग, प्रा. सिमा गोंडनाले, प्रा. शैलेश तिवारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.