शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ग्रामीण पेयजय कार्यक्रम अंमलबजावणी कार्यशाळा

By admin | Updated: August 30, 2014 23:28 IST

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा यांच्यावतीने एक

भंडारा : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा यांच्यावतीने एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश सुशीर, उपकार्यकारी अभियंता व्ही.व्ही. करनेवार, उपअभियंता देशमुख, उपअभियंता बावनकर, गोन्नाडे, शाखा अभियंता भारत निर्माण कक्ष पी.एम. सावरकर, व्ही.सी. पिपरे, जे.वाय. बलभद्रे उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची माहिती देवून कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने नवीन सुधारीत शासन निर्णयानुसार फायदा करून घेता येईल, याबाबत उपकार्यकारी अभियंता करनेवार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राहूल द्विवेदी यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी अस्तित्वातील शासन निकषामध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले.ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा, पाणीपुरवठा योजनासाठी हागणदारीमुक्तीचे सुधारित धोरण, ग्रामीण पाणी पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी पूर्ण रद्द करणे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना आणि शासन निर्णयानुसार त्याची अंमलबजावणी याबाबत आशावाद व्यक्त केला.सतीश सुशीर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने मागणी आधारित लोकसहभागाचे लोकाभिमूख धोरण स्विकारून योजनांच्या भांडवली खर्चामध्ये १० टक्के लोकहिस्सा लोकवर्गणीचा राहिल, अशी तरतूद केली होती. मात्र लोकवर्गणी जमा होत नसल्याने ती अट शासनाने रद्द केली असल्याची माहिती दिली आहे.कार्यशाळेला प्रगती पथावरील व रखडलेल्या कृती आराखड्यामध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या योजनांचा गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, संबंधित उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उपस्थिती होती. संचालन अजय गजापूरे यांनी तर आभार बबन येरणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, मूल्यमापन व सनियंत्रण सल्लागार सुशांत ढोके, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ निलिमा जवारे, लखाधिकारी प्रशांत फाये, स्वच्छता तज्ज्ञ गजानन भेदे, भूषण मुळे, देवेंद्र खांडेकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)