तुमसर : तुमसरातील एका राष्ट्रीय युवा खेळाडूने धान्यात घालणारे औषध खाल्ले. तिला उपचाराकरिता स्थानिक शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी दुर्लक्ष केल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी लावला आहे. संबंधित डॉक्टरसह उपस्थित कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. मृत महिला खेळाडूचे नाव पूजा अरुण कापसे (१६) रा.माकडे वॉर्ड, तुमसर असे आहे.रविवारी तिने स्वयंपाक केला. तत्पूर्वी पूजाने तांदळात ठेवलेले सल्फेट नामक पावडर खाल्ले. त्यामुळे तिची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे तिला उपचाराकरिता स्थानिक सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने रात्री ११.४५ वाजता पूजाची प्राण्योत मालवली. पूजाच्या मृत्यूच्या कारणीभूत डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)शवविच्छेदन अहवालात पूजाचा मृत्यू विष प्राशन केल्याने झाला असून तिचा व्हिसेरा नागपूर मेडीकल कॉलेजला पाठविला आहे. याप्रकरणी डॉ.वाघ यांना कारणेदाखवा नोटीस दिली आहे.- डॉ.सचिन बाळबुद्धेप्रभारी अधीक्षक, शासकीय सुभाषचंद्र बोस रुग्णालय, तुमसर
राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: June 3, 2015 00:45 IST