शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नणंदेला पाच वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 05:00 IST

उल्लेखनीय म्हणजे गुन्हा दाखल करताना सविता बावणेविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणीसह अनुसूचित जाती-जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पुरावे व तपासाअंती न्या. खुणे यांनी सविता बावणे हिच्यावर आरोप सिद्ध झाल्याचे सांगितले. या प्रकरणी २१ जून रोजी न्या. खुणे यांनी सविताला पाच वर्ष सश्रम कारावास तसेच ४९८ (अ) व ॲट्राॅसिटी अंतर्गत प्रत्येक गुन्ह्यात प्रत्येकी हजार रुपये द्रव्य दंडाची व दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या वहिनीचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नणंदेला पाच वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सविता शंकर बावणे (२९) रा. डव्वा (धारगाव) असे महिला आरोपीचे नाव आहे. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी दिला.माहितीनुसार, साकोली तालुक्यातील वडेगाव येथील लाला जयराम बांबोर्डे यांची मुलगी डिम्पल हिचा आंतरजातीय विवाह भंडारा तालुक्यातील डव्वा धारगाव येथील नरेंद्र ऊर्फ मुन्ना कोसरे याच्यासोबत २०१६ मध्ये झाला. लग्नानंतर डिम्पल ही डव्वा येथे असताना विवाहित असलेली तिची नणंद सविता बावणे ही सुद्धा डव्वा येथे होती. आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून वहिनी डिम्पल कोसरे हिचा ती सातत्याने छळ करीत होती. जातीय द्वेषामुळे डिम्पल प्रचंड त्रासली होती. मानसिक व शारीरिक त्रास असह्य झाल्याने तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत डिम्पल कोसरे हिचे वडील लाला बोंबार्डे यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी ९ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी केला. तपासाअंती डिम्पलची नणंद सविता बावणे ही डिम्पलला आंतरजातीय प्रेमविवाह व जातीय द्वेषामुळे तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे दिसून आले. तिला अटक करून प्रकरण जिल्हा व सत्र न्यायायलात प्रविष्ट करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्या. पी. एस. खुणे यांच्यासमक्ष सरकारी पक्षातर्फे ॲड. दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. उल्लेखनीय म्हणजे गुन्हा दाखल करताना सविता बावणेविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणीसह अनुसूचित जाती-जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पुरावे व तपासाअंती न्या. खुणे यांनी सविता बावणे हिच्यावर आरोप सिद्ध झाल्याचे सांगितले. या प्रकरणी २१ जून रोजी न्या. खुणे यांनी सविताला पाच वर्ष सश्रम कारावास तसेच ४९८ (अ) व ॲट्राॅसिटी अंतर्गत प्रत्येक गुन्ह्यात प्रत्येकी हजार रुपये द्रव्य दंडाची व दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. दुर्गा तलमले यांनी, तर पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, एसडीपीओ विजय डोळस, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अमलदार विनोद बघेल यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

ॲट्राॅसिटीअंतर्गत कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा- लाला बोंबार्डे यांच्या तक्रारीनंतर सविता बावणेविरुद्ध साकोली पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त करणे यासह अनुसूचित जाती जनजाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यात ॲट्राॅसिटीअंतर्गत सविता बावणे हिला एकूण विविध कलमांतर्गत प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपयांची द्रव्यदंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. सविताला विविध कलमांतर्गत ठोठावण्यात आलेली शिक्षा सोबतच भोगायची आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालय