शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नाव वाघाचं, प्रकरण प्रेमाचं !

By admin | Updated: June 11, 2016 00:26 IST

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली एक विवाहिता जंगलातून अचानक गायब झाली. त्यानंतर वाघाने खाल्ल्याची अफवा पसरविण्यात आली.

नवरगाव येथील घटना : विवाहितेचे तरुणासोबत पलायनअड्याळ/चिचाळ : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली एक विवाहिता जंगलातून अचानक गायब झाली. त्यानंतर वाघाने खाल्ल्याची अफवा पसरविण्यात आली. तब्बल १५ दिवसांनंतर ही विवाहिता प्रियकरासोबत पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. प्रेमासाठी वाटेल ते करण्याचा हा प्रकार नवरगाव येथे उघडकीस आला आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव जंगलात ३६ वर्षीय विवाहित महिला तेंदूपत्ता संकलनासाठी गेली होती. त्याठिकाणी तिचा प्रियकर तिची वाट पाहत बसलेला होता. तिला पळून जायचे असल्यामुळे तिने वाघ-वाघ असा आरडाओरड केली. त्यामुळे तिच्यासोबतच्या असलेल्या महिला मजुरांनी तिथून धूम ठोकली. त्यानंतर तिचा पती कवडू गणवीर यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी नागरिक, पोलीस व वनविभागाचे कर्मचाऱ्यांना जंगल पिंजून काढले असता तिचे कपडे आढळून आले. मात्र वाघाने ठार केल्याच्या कुठल्याही खुणा ठाणेदार अजाबराव नेवारे, उपनिरीक्षक विठ्ठल मोरे व अड्याळचे वनक्षेत्राधिकारी प्रमोद महेशपाठक, पवनीचे लागवड अधिकारी भाग्यश्री पोले यांना दिसून आल्या नाही. त्या पे्रयसी महिलेला दोन अपत्ये आहेत. त्यांच्या घरी नीलेश वैद्य (२९) या तरुणाचे येणे-जाणे होते. दरम्यान नीलेश व महिलेत प्रेमसंबंध जुळून आले. काही दिवसापूर्वी दोघांनी योजना आखून जंगलातून सुवर्णाला वाघाने खाल्याची अफवा पसरवून ते दोघेही पळून गेले असावी, अशी चर्चा गावात सुरू झाली. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनात पाच लोकांचे पथक तयार करून अड्याळचे उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, हवालदार सतदेवे, महिला पोलीस टेंभुर्णे, पोलीस शिपाई बनकर व नवरगावचे पोलीस पाटील यांना गोपणीय माहितीवरुन नाशिकला पाठविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील कोटांगगाव येथे गवताच्या झोपडीत त्यांनी संसार थाटला होता. पोलीस आपल्या मागावर असल्याची त्यांना भनकही नसतांना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून अड्याळला येथे आणले. शुक्रवारला अड्याळ पोलीस ठाण्यात तिला व तिचा प्रियकर नीलेश बालकदास वैद्य याला हजर केले असता त्या दोघांनी पळून गेल्याची कबुली दिली. (वार्ताहर)