शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा

By admin | Updated: January 17, 2015 22:53 IST

गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो.

भंडारा : गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो. ज्यांना आधी जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावले त्यांची फक्त 'घर वापसी' होत आहे. त्याला आम्ही धर्मांतरण मानत नाही. आपल्या धर्माला मानणे हा काही दोष नाही. अयोध्येत राममंदिर उभारणारच याला कोणताही धर्म रोखू शकत नाही. प्रत्येक हिंदूच्या मनात अयोद्धेबाबत एकच कल्पना आहे, ती म्हणजे रामललाचा मंदिर उभारणे होय. कुणाचीही निंदा कधी करू नये. उत्तम संस्कारातून चरित्रवान पिढी निर्माण करण्यावर भर दिला गेला पाहिजे, असेही महाराज म्हणाले. रविदास खाकी महाराज म्हणाले, गोहत्या थांबविण्यासाठी प्रत्येकाने विडा उचला पाहिजे. गोमातेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूमध्ये जागृती झालीच पाहिजे, जेणे करून येणाऱ्या पिढीला त्याचा वारसा जपता येईल. बाल वैदेही साध्वी बालिका सरस्वती यांनी महिला व युवतींना सशक्त होण्याचे आवाहन केले. जो महिलेची छेड काढतो त्याला त्याचवेळी धडा शिकविला पाहिजे. महिला अबला नसून सबला आहे. बाहेर देशातील शत्रू आपल्या देशात शिरून आपल्याला ललकारत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवायलाच हवा. यावेळी भदंत रावजी पिंडे, प्रा. व्यंकटेश आबदेव, अन्नाजी हांडे यांनीही मार्गदर्शन केले. संमेलनाची सुरूवात महाराजांच्या हस्ते गोमातेचे पूजन व भारत माता यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात होण्यापुर्वी दुर्गा वाहिणीच्या सदस्यांनी तलवारबाजी व सुरक्षा संदर्भात प्रदर्शन सादर केले. संचालन सुभाष आजबले यांनी तर प्रास्ताविक विहिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय एकापुरे यांनी केले. यावेळी उपस्थित हजारो बांधवांनी 'अन्नरक्षण' बाबत प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)