शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४८ ठिकाणी नमाज पठन

By admin | Updated: July 19, 2015 00:47 IST

जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी आज, शनिवारी रमजान ईद उत्साहात साजरी केली. जिल्ह्यातील ४८ ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी ...

रमजान ईद उत्साहात : देशात शांती नांदावी यासाठी साकडेभंडारा : जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी आज, शनिवारी रमजान ईद उत्साहात साजरी केली. जिल्ह्यातील ४८ ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक मशिदीत त्यांनी अल्लाकडे नमाज अदा केला आणि सुखशांतीसाठी दुआ केली. नमाज अदा केल्यानंतर मौलवींनी देशात शांती नांदावी, अशी दुआ मागितली. पवनी पोलीस ठाणे अंतर्गत ५ ठिकाणी नमाज पठण करण्यात आले. याप्रमाणे अड्याळ ५, जवाहरनगर २, भंडारा ९, कारधा ३, मोहाडी ४, आंधळगाव ४, सिहोरा १, साकोली ३, लाखनी ३, पालांदूर १, लाखांदूर ४, दिघोरी १, तुमसर २, गोबरवाहीत ६ ठिकाणी नमाज पठण करण्यात आले. भंडारा शहरात मुस्लीम लायब्ररी चौक, टप्पा मोहल्ला, शितला माता मंदिर परिसर, मेंढा परिसर, पोस्ट आॅफिस चौक आदी परिसरात मुस्लिमबहुल वस्ती आहे. शहरात ४ ठिकाणी मोठ्या संख्येने नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत प्रत्येकाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. मोबाईलद्वारे एसएमएस शुभेच्छाही देण्यात आल्या. घरोघरी कौटुंबिक सदस्यांसह शीरकुर्म्याचा आस्वाद घेण्यात आला. बच्चे कंपनीतही ईदचा उत्साह होता. त्यांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत गोडधोड पदार्थांवर ताव मारला. मुस्लिम मोहल्यात फलाहार, फिरनी, शिरा, मालपुआ, खजूर, रबडी, मिठाई आदी पदार्थांची रेलचेल होती. प्रत्येक जण नवा पेहराव करून उत्साहात सहभागी झाला होता.रमजान ईदला मुस्लिम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज सकाळपासूनच शहरातील मुस्लिम बहुल भागात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले. शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात येत असल्याने शहरात सर्वधर्म समभाव दिसल्याचे दिसून आले. अनेकांनी पावसासाठी अल्लाकडे साकडे घातले. (नगर प्रतिनिधी)दुधाला प्रचंड मागणीरमजान ईदनिमित्त शीरकुर्म्यासाठी दूध मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. समाजाच्या काही बांधवांनी गरिबांसाठी कमी दरात दुधाची विक्री केली. आज दुधाला प्रचंड मागणी होती.ग्रामीण भागातही उत्साहशहरी भागासह ग्रामीण भागातही रमजान ईदचा उत्साह दिसून आला़ सर्वधर्मियांनी ईदमध्ये सहभागी होऊन मुस्लिम धर्मियांना शुभेच्छा दिल्या़ सर्वत्र शांततेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली़