शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आंदोलनानंतर नमला शिक्षण विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

भंडारा तालुक्यातील व धारगांव केंद्रांतर्गत असलेल्या गुंथारा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल येथील सहाय्यक शिक्षिका निखाडे यांची प्रकृती वर्षभरापासून ठिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार पालकांनी केली होती. तसा अर्जसुध्दा शाळा व्यवस्थापन समितीकडून वरिष्ठांना देण्यात आला होता.

ठळक मुद्देपालकांनी ठोकले कुलूप : गुंथारा येथे जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक रूजू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील गुंथारा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल येथे शिक्षिकेच्या कार्यप्रणालीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येथे तातडीने नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी मंगळवारी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. आंदोलनाला तासभर होत नाही तोच शिक्षण विभागाने एकाची शिक्षकाची नियुक्ती केली. त्यांनतर या आंदोलनाची सांगता झाली. अखेर गावकऱ्यांपुढे शिक्षण विभाग नमले.भंडारा तालुक्यातील व धारगांव केंद्रांतर्गत असलेल्या गुंथारा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल येथील सहाय्यक शिक्षिका निखाडे यांची प्रकृती वर्षभरापासून ठिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार पालकांनी केली होती. तसा अर्जसुध्दा शाळा व्यवस्थापन समितीकडून वरिष्ठांना देण्यात आला होता. यासह सहाय्यक शिक्षिका निखाडे यांनी स्वत: वरिष्ठांना अर्ज करुन विद्यार्जन करताना त्रास होत असल्याचे कळविले होते. परंतु कोणतीच उपाययोजना करण्यात आली नव्हीती. अखेर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.यावेळी पंचायत समिती सदस्य टेकराम पडोळे, सरपंच शुभांगी सार्वे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोविंदा सार्वे, पोलीस पाटील नरेंद्र सार्वे, जिल्हा परिषद माजी सदस्य राजू सय्याम, राजू सूर्यवंशी, सविता नागदेवे, माजी उपसरपंच उमेश सार्वे, आनंद भोयर, रामाजी झंझाळ, निशा कांबळे, वैशाली कोराम, सतीश जगनाडे, सुनील बोरकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक उपस्थित होते.विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारासमोर चटई टाकून विद्यार्थ्यांना बसविले होते. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेसमोर उपस्थितांचे मार्गदर्शन सुरु असताना तासभरात नवनियुक्त शिक्षक तिथे पोहचले. त्यांची परिचय देत या शाळेत नवीन शिक्षक म्हणून आल्याचे सांगितले. प्रशासनाने नवीन शिक्षकाला गुंथारा येथील शाळेत रूजु होण्यास पाठविल्याने पंचायत समिती सदस्य टेकराम पडोळे यांनी शाळेचे कुलूप उघडले. नेहमी प्रमाणे शाळा भरल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या नवीन शिक्षकांचे शाळा व्यवस्थापण समिती, पालक वर्ग व ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी स्वागत केले. नवीन शिक्षकांची नियुक्ती होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून आता शाळेत चार शिक्षक कार्यरत आहेत.गावकऱ्यांचा अल्टिमेटमवर्ष होऊनही शिक्षकांच्या नियुक्तीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा करीत होते. त्यामुळे सहाय्यक शिक्षिका निखाडे यांना शाळेत जावे लागत असे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याची दखल घेत पालकांनी शिक्षण विभागाकडे निवेदन दिले. निवेदनात १९ नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला. मात्र मागणीची पुर्तता झाली नाही. मंगळवारी शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्याम सार्वे यांच्या नेतृत्वात शाळेला कुलूप ठोकण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र