शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीवासीयांच्या नजरा नगरपरिषद निवडणुकीकडे

By admin | Updated: October 10, 2015 00:59 IST

भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात असलेलया ग्रामपंचायतचे रुपांतर तब्बल ७७ वर्षांनी नगर पंचायतमध्ये झाले.

नगर पंचायत रद्द : ८१ इच्छुकांनी दाखल केले होते नामांकनसाकोली : भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात असलेलया ग्रामपंचायतचे रुपांतर तब्बल ७७ वर्षांनी नगर पंचायतमध्ये झाले. दहा महिन्यानंतर नगर पंचायतचे रुंपातर नगर परिषदेत होणार असा राज्यपालाचा अध्यादेश आला आणि मधेच नगर पचांयतची निवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला होता. मात्र उच्च न्यायालयाचे स्थगनादेश मिळताच साकोलीवासीयांच्या नगर परिषदेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून आता नजरा नगरपरिषद निवडणुकीकडे लागलेल्या आहेत.पूर्वी इंग्रजकाळापासून भंडारा जिल्हयात साकोली व गोंदिया हे दोन तालुके होते. त्यातही भंडारा व गोंदिया तालुक्यानंतर साकोली येथील ग्रामपंचायत ही जुनी ग्रामपंचायत म्हणून लौकीकास आली होती. कालांतराने जिल्हयात बऱ्याच ग्रामपंचायत व तालुके झाली. मात्र साकोली विकासात्मकदृष्ट्या मागेच राहिली. एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत राहिली. मात्र ग्रामपंचायतचे रुपांतर नगर परिषदेत होऊ शकले नाही.दहा वर्षापूर्वी माजी आमदार सेवक वाघाये यांनी नगर परिषदेसाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी नगर पंचायतीची घोषणा होऊन अधिसूचनाही जाहिर करण्यात आली होती. मात्र काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया तशीच थंडबस्त्यात राहिली. यानंतर साकोली ग्रामपंचायतकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. मागीलवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील तालुकास्तरावर असलेल्या सर्वच ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतमध्ये केले. त्यात साकोली ग्रामपंचायतीचाही समावेश होता. त्याच आधारावर साकोली नगर पंचायतची प्रक्रिया सुरु होती. दोन महिन्यपुर्वी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी नगर पंचायतचे रुपांतर नगर परिषदेत व्हावे यासाठी प्रयत्न केले. साकोली सेंदुरवाफा दोन्ही गावे मिळून नगरपरिषेदची अधिसुचनाही निघाली मात्र आदेशाच्या निर्धारित वेळेअभवीच नगरपंचायतीच्या निवडणूका घोषीत झाल्याने नागरिकांत संभ्रम वाढला. आधीच अडीच वर्षात ग्रामपंचायत बरखास्त करुन नगरपंचायत झाली व आताही शासनाची भुमीका स्पष्ट नव्हती. एकीकडे नगर परिषदेची अधिसुचना व दुसरीकडे नगर पंचायतीच्या निवडणुका या संभ्रमात माजी सभापती मदन रामटेके यांनी जनहीत याचिका टाकून स्थगतादेश मिळविला. या स्थगनादेशावरुन पुन्हा प्रक्रीया तर वाढलीच मात्र आता साकोली नगर परिषद केव्हा होणार याकडे साकोलीवासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)