शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीत नगरपरिषदेची अडचण?

By admin | Updated: February 5, 2015 23:02 IST

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील तालुकास्तरीय २३८ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय केला. या नगरपंचायतीमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी व मोहाडी

संजय साठवणे - साकोलीमहाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील तालुकास्तरीय २३८ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय केला. या नगरपंचायतीमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी व मोहाडी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या तिनही नगरपंचायतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त घोषणेची औपचारिकता बाकी असताना साकोली नगरपंचायतीच्या स्थगीतीला प्रस्ताव नुकताच ग्रामविकास मंत्रालय मुंबई येथे पोहचल्याने साकोली नगरपंचायत होणार की नाही यात शंका आहे.माहितीनुसार, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील १३८ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यानुसार शासनस्तरातून जवळपास पूर्णच प्रक्रिया पूर्ण झाली असून ग्रामपंचायत ठरावासह इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. ३ ला साकोलीचे पंचायत समिती सदस्य मदन रामटेके, मोहाडीचे पंचायत समिती सदस्य कोसरे व लाखनीच्या पंचायत समिती सदस्या निखाडे यांना त्या त्या गावाच्या नगरपंचायती संदर्भात त्यांची पदे रद्द होत असल्यामुळे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात त्यांना बोलावून त्यांचेकडून लेखी घेण्यात आले. यावेळी तिन्ही सदस्यांनी नगरपंचायत करण्यास काहीही हरकत नसल्याचे लिहून दिले.यानंतर जिल्हाधिकारी माधवी खोडे या स्वत: याच प्रकरणाच्या संदर्भाने तात्काळ मुंबई येथे निघून गेल्या. त्यामुळे याच महिन्यात तिन्ही नगरपंचायतीसंदर्भात नक्कीच निर्णय होऊ शकतो. यात मात्र हे तिन्ही पंचायत समिती क्षेत्र कमी होणार आहेत. तशी माहिती संबंधित सदस्यांना कळविण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. अनेक दिवसापासून नगरपंचायतीचे वेध साकोलीवासीयांना लागलेले असताना प्रस्तावाच्या स्थगीतीबाबत तालुक्यात चर्चेला उधान आलेले आहे.