शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही, जिल्ह्यात पाच रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

भंडारा : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) हा आजार उद्‌भवत आहे. जिल्ह्यात या आजाराचे पाच रुग्ण ...

भंडारा : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) हा आजार उद्‌भवत आहे. जिल्ह्यात या आजाराचे पाच रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा आजार संपर्कामुळे होत नसल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे, मात्र कोविड नियमांचे पालन करणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीसोबतच अन्य आजारही समोर येत आहेत. त्यात म्युकरमायकोसिस हा आजार आता सतावत आहे. हा आजार रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे होत नाही, तर स्वतःची बेफिकिरी आणि नियमांचे पालन न करणे, यामुळे होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्यास व त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास व त्याच स्थितीत तो नियमांचे पालन न करता रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्याला आजार उद्‌भवू शकतो. मात्र मधुमेह व प्रतिकारक्षमता कमी असल्यास त्यालाही हा आजार होऊ शकतो. अशा स्थितीत काळजी आणि फक्त काळजी हेच त्यावर रामबाण औषध आहे. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेऊन त्यावर औषधोपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी, म्युकरमायकोसिस याला हलक्यात न घेता त्याबाबत काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

बॉक्स

औषधांचा पुरेसा साठा

भंडारा जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण उपचार घेत असून अन्य दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारावर प्रभावी असलेली इंजेक्शन्स जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. औषधींची कमतरता नसल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्यास त्याअनुषंगाने औषधेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जेणेकरून भविष्यात औषधांबाबतीत टंचाई उद्भवू नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासन त्या दिशेने पाऊल टाकत आहे.

बॉक्स

ही घ्या काळजी...

रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे, सोबतच कान, नाक, घसा, नेत्र व दंतरोगतज्ज्ञ यांच्याकडून एक आठवड्यानंतर तपासणी करावी, लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

बॉक्स

म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे...

या आजारात चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधीरपणा येणे, नाकावर सूज येणे, नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव वाहणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे अशी लक्षणे दिसू लागतात.

बॉक्स

डॉक्टर काय म्हणतात...

ज्या व्यक्तीला मधुमेह व त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, अशांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यांनी कोविड १९ नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही.

डॉ. नितीन तुरस्कर, भंडारा

जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजाराबाबत औषधे उपलब्ध आहेत. इंजेक्शन्ससुद्धा उपलब्ध असून नागरिकांनी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. उपचार हेच त्यावरील योग्य निदान आहे.

- डॉ. निखिल डोकरीमारे, भंडारा.

रुग्णांना लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला तर घ्यावाच, सोबतच कान, नाक, घसा व डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. जेणेकरून वेळीच औषधोपचार करून सुरक्षित राहता येईल.

- डॉ. प्रमोद धुर्वे, भंडारा