शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लीम बांधवांचा मोर्चा

By admin | Updated: October 21, 2016 00:42 IST

मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून जिल्ह्यातील जमियते उलेमा हिंद संघटनेद्वारा १८ आॅक्टोबरला शहरात मोर्चा काढण्यात आला

भंडारा : मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून जिल्ह्यातील जमियते उलेमा हिंद संघटनेद्वारा १८ आॅक्टोबरला शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद साजीद यांनी केले. सदर मोर्चा मुस्लीम लायब्ररी चौकातून काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहचल्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रपती तथा राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. भारत देशातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश व पश्चिम बंगाल राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्र शासन मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावर कानाडोळा करीत आहे. मुफ्ती मोहम्म्द साजीद म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समुदायाचे मोठे योगदान आहे. मागील शासनाने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र विद्यमान शासन त्या निर्णयावर दुर्लक्ष करीत आहे. सदर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मोर्च्यात संघटन सचिव मौलाना फराज अहमद, जिया पटेल, शम्मु शेख, नगरसेवक मकसुद खान, राजू हाजी सलाम, फरहान पाशा पटेल, अनिक जमा पटेल, जकरीया खत्री यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)