शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
2
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
3
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
4
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
5
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
6
"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट
7
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
8
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
9
ITI प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ; ६ जूनपासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू
10
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
11
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
12
Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
14
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
15
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
16
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
17
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
18
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
19
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
20
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI

हरदोली-कर्कापूर मार्गावर विना रॉयल्टीचा मुरूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:49 IST

हरदोली ते रेंगेपार गावापर्यंत नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. या रस्ता बांधकामात विना रॉयल्टीचा मुरूम उपयोगात आणला जात असल्याचा आरोप हरदोलीचे सरपंच आणि गावकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. यामुळे गावात प्रशासन विरोधात संताप निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहरदोली गावाच्या शिवारात खड्डेच खड्डे : सरपंच आणि गावकऱ्यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : हरदोली ते रेंगेपार गावापर्यंत नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. या रस्ता बांधकामात विना रॉयल्टीचा मुरूम उपयोगात आणला जात असल्याचा आरोप हरदोलीचे सरपंच आणि गावकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. यामुळे गावात प्रशासन विरोधात संताप निर्माण झाला आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावापासून कर्कापूर, रेंगेपार गावापर्यंत नव्याने डांबरीकरण रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. रस्ता डांबरीकरणासाठी ४ कोटी रूपये मंजुर झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या गावांना जोडणाºया पुर्वीच्या डांबरीकरण रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. नव्याने रस्त्याचे बांधकाम करताना गिट्टी आणि मुरूमाने खडीकरण करण्यात येत आहे. या कामाकरिता १२०० ब्रास मुरूमाचे खोदकाम विना रॉयल्टीने करण्यता आले आहे. ज्या जागेत मुरूम खोदकाम करिता मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. या नियोजित जागेतनू मुरूमाचे खोदकाम करण्यात आले नाही. परंतु हरदोली गावाचे शिवारातून बेधडक मुरूमाचे खोदकाम करण्यात आल्याने जिवघेणे खड्डे जागो जागी तयार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राज्य शासनाचा महसूल बुडाला आहे. रस्ता डांबरीकरणाचे कंत्राट त्रिमुर्ती नामक कंपनीला असले तरी चोरीच्या मार्गाने मुरूमाचा उपयोग करण्यात येत आहे. या मुरूमाला रॉयल्टी असल्याची साधी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला नाही.गाव हद्दीतून मुरूमाचे खोदकाम सुरू असताना महसूल विभागाची यंत्रणा बेखबर असल्यासारखे वागत आहे. या संदर्भात सुरूवातीला उपसरपंच रमेश कावळे यांनी महसूल विभागाचे यंत्रणेला सत्यता सांगितली आहे. यंत्रणा साधी चौकशी आणि कारवाई करित असल्याने हा स्थानिक गावकऱ्यांचा अवमान असल्याचा आरोप सरपंच नितीन गणवीर यांनी केला आहे. गावाचे हद्दीतून खुलेआम दिवसा ढवळ्या मुरूमाचे जेसीबी मशिनचे सहायाने अवैध खोदकाम करण्यात येत आहे.विकासाला कुणाचा विरोध नाही. परंतु स्थानिक पातळीवर मुरूमाचे ट्रॅक्टर आढळून आल्यास महसूल विभागाची यंत्रणा कारवाई डोक्यावर घेत आहे. परंतु या बड्या कंत्राटदाराचे विरोधात कारवाई शुन्य आहे. रस्ता बांधकामात उपयोगात आणला जाणाºया मुरूमाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.रॉयल्टीच्या नावावर शासनाची दिशाभूलसिहोरा परिसरात नव्याने रस्ता बांधकामाचे विकास कार्यांना मंजुरी मिळाली आहे. कामे जलद गतीने सुरू करण्यात आली आहे. परंतु मुरूमाचे रॉयल्टी काढताना महसूल विभागाचे डोळ्यात मिरचीची पुड घातली जात आहे. २०० ब्रास मुरूम खोदकामाची मंजुरी घेण्यात येत असताना २ हजार ब्रास मुरूम खोदकाम केले जात आहे. यामुळे यात आलबेल होत असल्याचा आरोप आहे.हरदोली गावांचे हद्दीतून खोदकाम करणाºया मुरूमाची लीज काढण्यात आली नाही.बेधडक मुरूमाची चोरी होत आहे. चौकशी न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.-नितीन गणवीर,सरपंच, हरदोली.