शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीविना मुरुमाचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:41 IST

गौण खनिज उत्खननाचे अतिशय कडक नियम आहे. परंतु तुमसर तालुक्यातील परसवाडा (दे) मांढळ शिवारात रस्ताशेजारी परवानगीविना शेकडो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येथे परवानगी मागविण्यात आली.

ठळक मुद्देप्रकरण परसवाडा-मांढळ शिवारातील

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गौण खनिज उत्खननाचे अतिशय कडक नियम आहे. परंतु तुमसर तालुक्यातील परसवाडा (दे) मांढळ शिवारात रस्ताशेजारी परवानगीविना शेकडो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येथे परवानगी मागविण्यात आली. परंतु अद्यापर्यंत परवानगी मिळाली नाही. तरी येथे पोकलॅड यंत्राने मुरुम उत्खनन सुरुच आहे.मनसर-गोंदिया दरम्यान राष्टÑीय महामार्गाचे काम सुरु आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरावाकरिता मुरुमाची अत्यंत गरज आहे. मुरुम भरावाकरीता परिसरात रितसर लीज मुरुम कंत्राटदारांनी घेतली आहे, परंतु परसवाडा-मांढळ शिवारात रस्त्याच्या शेजारी एका खाजगी गटात नियमबाह्य मुरुम उत्खननाचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. सुमारे १० ते १२ फुट खोल भले मोठे खड्डे मुरुम उत्खननामुळे तयार झाले आहेत. येथे पोकलँड यंत्राने मुरुम उत्खनन करणे सुरु आहे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसुल निश्चितच बुडत आहे.येथील कंत्राटदाराने खाजगी गट मालकाकडून परवानगी घेऊन मुरुम उत्खननाची परवानगीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा खनिकर्म विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे. स्थानिक तहसील प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले नाही. अशी माहिती आहे. ५०० ब्रासपेक्षा जास्त मुरुम उत्खननाकरिता थेट जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी परवानगी देतात अशी माहिती आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित कंत्राटदाराला अजूनपर्यंत मुरुम उत्खननाची परवानगी मिळाली नाही. अशी माहिती आहे, परंतु मुरुम उत्खननला येथे सुरुवात करण्यात आली. स्थानिक तलाठी कार्यालयाकडे या संदर्भात माहिती उपलब्ध नाही.तहसील प्रशासनाकडे अजूनपर्यंत परवानगीचे पत्र जिल्हास्तरावरुन आले नाही, असे समजते. त्यामुळे येथे सावळागोंधळ सुरु आहे. याप्रकरणी तहसील प्रशासन येथे कारवाई करणार असल्याचे समजते.मुरुमाचा वापर रस्ता भरावातमनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता भरावात मुरुमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हजारो ब्रास मुरुमाची येथे गरज आहे. यापूर्वी मोहाडी तालुक्यातील मुरुम लीज प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथे रस्ता बांधकाम कंत्राटदाराचा मुरुम उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराशी थेट संबंध नाही. मुरुम उत्खनन करणारा कंत्राटदार हा पुरवठादार आहे.परसवाडा-मांढळ शिवारात मुरुम उत्खनन प्रकरणी तहसील प्रशासनाकडे कागदोपत्री माहिती पुरविण्यात आली नाही. येथे थेट भंडारा मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागितली असेल. सध्या मुरुम उत्खनन करणाऱ्याकडे परवानगी नसल्यास गौण खनिज नियमाअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर