शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

पालिका मुख्याधिकाऱ्यांची नगरसेवकांशी अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:27 IST

साकोली नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नगरसेवकांशी अरेरावी करीत असल्याचा आरोप करीत मुख्याधिकाऱ्याचे स्थानांतरण न झाल्यास नगरसेवक राजीनामे देण्याच्या तयारीत आले. यामुळे साकोली शहरात वातावरण चांगलेच तापले आहे.

ठळक मुद्देसाकोली येथील प्रकार : पाहणीसाठी मुख्याधिकारी आलेच नाही

आॅनलाईन लोकमतसाकोली : साकोली नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नगरसेवकांशी अरेरावी करीत असल्याचा आरोप करीत मुख्याधिकाऱ्याचे स्थानांतरण न झाल्यास नगरसेवक राजीनामे देण्याच्या तयारीत आले. यामुळे साकोली शहरात वातावरण चांगलेच तापले आहे.साकोलीला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख हे नेहमीच नगरसेवकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानीत करतात. तसेच बैठकीत कंवा नगरपरिषदेत नगरसेवकांनी जर काही विचारले असता, ‘तुम्हाला ते अधिकार नाही. तुम्हाला फक्त नियोजन करण्याचा अधिकार आहे, असे बोलून अपमानीत करतात, असे नगरसेवकांचे म्हणने आहे. मंगळवारीही असाच प्रकार घडला. पंचशिल वॉर्डात सोमवारपासून दोन सिमेंट रस्त्याचे काम सुरु झाले. ही दोन्ही कामे अंदाजपत्रकानुसार होत नाही. अशी तक्रार सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना करीत कामाची पाहणी करण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र मुख्याधिकाºयांनी काम पाहण्यास येण्यासाठी नकार दिला, व नगरसेवकांनाही तुम्हालाही तिथे जाण्याचा अधिकार नाही, असे बोलले. यावर संतप्त नगरसेवकांनी मुख्याधिकाºयांचा विरोध करीत रस्त्याच्या कामाची पाहणी केली. मात्र मुख्याधिकारी व नगराध्यक्ष धनवंता राऊत या काम पाहण्यासाठी आल्या नाहीत. मागील पंधरा दिवसांपासून साकोली नगरपरिषदेत लाईट व बोरवेलचे पाईप नाहीत. हे खरेदी करण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे नगरसेवकांचे म्हणने आहे.मुख्याधिकारी देशमुख यांच्या जागी दुसरा मुख्याधिकारी न दिल्यास सर्व नगरसेवक सामूहिक राजीनामे देऊ असा पवित्रा पालिका उपाध्यक्ष तरुण मल्लानी, गटनेता अनिता पोगडे, नगरसेविका वनिता डोये, गीता बडोले, टेंभुर्णे, रवी परशुरामकर, अ‍ॅड.दिलीप कातोरे, सुभाष बागडे, मोहन चांदेवार, सभापती मिना लांजेवार, मनिष कापगते यांनी घेतला आहे.मुख्याधिकारी देशमुख हे महिला नगरसेवकांशी नेहमीच उद्धट भाषेत बोलत असून त्यांना अपमानीत करतात. नगरपरिषदेत महिला नगरसेवकांना काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी याची वेळीच दखल घ्यावी व महिला नगरसेवकावर होणारा अन्याय दूर करावा.- अनिता पोगडे, गटनेता, साकोली नगर परिषदकामाची पाहण्याकरिता नगरसेवक जाऊ शकतात. एखाद्या कामाची तक्रार असल्यास आधी अभियंता जाऊन चौकशी करतील. त्या चौकशी अहवालावर मी पुढील कार्यवाही करीन, असे बोललो. माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी कुठलीही अरेरावी किंवा अपमान केलेला नाही.- विजय देशमुख, मुख्याधिकारी, नगर परिषदसाकोली