शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहर स्पर्धेसाठी पालिका प्रशासनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:27 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू झालेले आहे. पवनी नगरात स्वच्छ सर्वेक्षण टिम पोहचली. टिमने अंतर्गत मुल्यमापन व लोकसहभागाची पातळी याबाबी जाणून घेणे सुरू केलेले आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू झालेले आहे. पवनी नगरात स्वच्छ सर्वेक्षण टिम पोहचली. टिमने अंतर्गत मुल्यमापन व लोकसहभागाची पातळी याबाबी जाणून घेणे सुरू केलेले आहे. नगरातील सर्व प्रभागात स्वच्छता राहावी यासाठी पालिका प्रशासन रात्रंदिवस डोळ्यात अंजन घालून जागता पहारा देत आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत अव्वलस्थान पटकाण्यासाठी पवनी नगर पालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे.नगरातील लहान मोठ्या रस्त्यावर धुळ राहु नये यासाठी काळजी घेतल्या जात आहे. हागणदारीमुक्त शहर घोषित झाल्याने एकही नागरिक उघड्यावर शौचास जावू नये यासाठी शिक्षक व न.प. कर्मचाऱ्यांचे पथक तळमळीने गावकुसाबाहेर पहारा देत आहेत. नगरात प्रवेश करणारे सर्व रस्ते कचरामुक्त करण्यात आलेले आहेत. गावात सर्वत्र नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे रस्त्यावर, घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या गेलेल्या आहेत. नगरात एकमेव असलेला बालोद्यान मोठ मोठी झाडे लागवड करून सुशोभित करण्यात आलेला आहे. जवाहर गेट ते वैनगंगा नदीवरील पुलापर्यंत दुतर्फा रॉयल पॉमची झाडे लावून रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. रस्त्याचे दुतर्फा वाढलेले झाडे झुडपे नाहिसे करून निलज कारधा राज्य मार्गाचा नगरातील भाग लक्षवेधी करण्यात आलेला आहे. गावातील मुख्य रस्त्याचे शहरीकरण करण्यात आलेले आहे. स्वच्छतेच्या अंतिम टप्प्यात लोकसहभाग वाढविण्याचा पालिका प्रशासन प्रयतन करीत आहे.नगरातील सार्वजनिक शौचालयाचे सुशोभिकरण करून पाणी व विद्युत सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी चौकाचौकात व शौचालयाबाहेर कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पालिकेची सर्व कामे बाजूला सारून प्रशासनाने स्वच्छतेचा ध्यास घेतल्याचे नगरात दिसून येत आहे. अशीच स्वच्छता नगरात दिर्घकाळ टिकून राहावी यासाठी पालिका प्रशासनाने जागृत राहाणे आवश्यक आहे.