शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिखला खाणीचे काम दिवसभर बंद

By admin | Updated: January 15, 2015 22:45 IST

चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत दरड कोसळून मलब्याखाली दाबल्या गेलेल्या मजुराचा बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मृत्यू झाला होता. मूळगाव राजापूर येथे गुरुवारी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुमसर : चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत दरड कोसळून मलब्याखाली दाबल्या गेलेल्या मजुराचा बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास मृत्यू झाला होता. मूळगाव राजापूर येथे गुरुवारी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताने पुन्हा चिखला खाणीत मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान आज दिवसभर माईलचे काम बंद होते. मॉईल व्यवस्थापनाच्या कामावर आमदार चरण वाघमारे यांनी नाराजी व्यक्त करुन घटनास्थळाच्या वास्तविक स्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी गोबरवाही पोलिसांना दिले आहेत.राजापूर येथील सरस हरिराम वरकडे (४५) हा बुधवारला दुपारी २ वाजता चिखला भूमीगत खाणीत कर्तव्यावर होता. दुपारी ३.३० च्या सुमारास मॉईलच्या दुसऱ्या पाळीत काम करीत असताना सहा ते आठ फुटांची दरड त्यांच्या अंगावर कोसळली. त्यावेळी वरकडे यांच्यासोबत आठ ते दहा मजूर, एक फोरमन तिथे होते. यावेळी अन्य मजुरांनी मातीचा मलबा बाहेर काढला. त्यानंतर मॉईलच्या स्थानिक डॉक्टरांकडे जखमी वरकडे यांना नेण्यात आले. वरकडे यांच्या घरी ही माहिती सायंकाळी उशिरा देण्यात आली. या अपघाताची माहिती खाण प्रशासनाने गोबरवाही पोलीस ठाण्यात दिली नाही. उपचाराकरिता त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच वरकडे यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालय परिसरात पोलीस चौकीत माहिती देण्यात आली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी गोबरवाही पोलिसांना अपघाताची माहिती दिली.नियमानुसार गोबरवाही पोलिसांना माहिती का देण्यात आली नाही. परिसरातील सरपंच, उपसरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ.हरेंद्र राहांगडाले, अशोक उईके यांनी आ.चरण वाघमारे यांना माहिती दिली. अपघातानंतर मॉईल व्यवस्थापन याच प्रकारे प्रकरण दडपत असल्याचा आरोप मजुरांनी यावेळी केला. या अपघाताची चौकशी करण्याकरिता नागपूर येथून विभागीय मॉईल व्यवस्थापक गुरुवारी सकाळीच चिखला येथे आले. सुरक्षेची माहिती घेतली. आज दिवसभर मॉईलचे काम बंद होते. या मॉईलमध्ये कंत्राटदार मजुरांची संख्या ५०० च्या वर आहे. ते सर्व मजूर गुरुवारी कामावर गेले नाहीत. उत्पादन दिवसभर बंद होते. वरकडे यांच्या अंत्यसंस्काराला मॉईल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. आ.चरण वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, डॉ.हरेंद्र राहांगडालेसह शिष्टमंडळाने गोबरवाही पोलीस ठाण्यात निवेदन देऊन घटनास्थळाची वास्तव स्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पोलीस मॉईलकडे रवाना झाले होते. (तालुका प्रतिनिधी)