शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष वाहिनीचा ‘दे धक्का’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:39 IST

‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने ‘दे धक्का’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने ‘दे धक्का’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले.हा मोर्चा लायब्ररी चौक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. भटक्या विमुक्त जाती जमाती व मच्छिमार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा शासनाला निवेदने देण्यात आली. त्यावर शासनाने आश्वासनांपलिकडे काहीही केले नसल्याचा आरोप केला. या समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेष मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जमातींना स्वतंत्र १३ टक्के आरक्षण देण्यात यावे, लोकसंखेच्या प्रमाणात अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी, नागपूर येथे सप्टेबरमध्ये काढलेल्या मोर्चात मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, तलावातील गाळ उपसून तलावावर होत असलेला अतिक्रमण काढण्यात यावा, महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १६८ नुसार मासेमारीच्या हक्काची महसुल अभिलेखात नोंद करण्यात यावी, संस्था नोंदणीत होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यात यावा, माजी खासदार स्व.जतीरामजी बर्वे यांनी निर्माण केलेल्या विदर्भ मच्छिमार संघाचे पुनर्निर्माण करून मच्छिमारांचा रोजगारांचा प्रश्न सोडविण्यात यावा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व वस्तीगृहांची व्यवस्था करण्यात यावी, भटक्या समाजातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ दयावा, अतिक्रमित घर जमीन व शेत जमिनीचे पट्टे भोगवटदारांच्या नावावर करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.या आंदोलनात नागपूरचे शंकरराव पुंड, संघर्ष वाहिणीचे तालुका संयोजक लोकेश नगरे, के.एन.नान्हे, रूपेश वासुदेव भानारकर, जनार्धन खेडकर, मासेमार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पचारे, कृष्णा केवट, सुनील शिवरकर, गोविंद मखरे, सुरेश खंगार, मनोज केवट, महादेव मेश्राम, सुभाष उके, महागु खंगार, नरेश वाघमारे, नरेश नान्हे, प्रभू केवट, ईसराम दिघोरे, बळीराम मेश्राम, दिवारू शेंडे, फागो मेश्राम, ज्ञानेश्वर केवट, श्रीराम मानकर, अरुण मांढरे, गजानन कागदे, कंसलाल चंदनबटवे यांच्यासह संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदचे पदाधिकारी, मासेमार समाज, भटके विमुक्त समाजबांधव उपस्थित होते.