शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र,राज्य शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:44 IST

शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रविवारला सकाळी १० वाजता गांधी चौक भंडारा येथे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ : शेतकऱ्यांची कर्जमाफी, महागाई, पेट्रोल-डिझेलचा मुद्दा ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रविवारला सकाळी १० वाजता गांधी चौक भंडारा येथे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.देशातील जनतेला भुलथापा देऊन सरकाने एप्रिल फुल बनविले आहे. ही सरकार शेतकºयांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे. त्यांचे कर्ज माफ झालेले नाही. बेरोजगारांना वर्षाला दोन कोटी नोकºया देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र बेरोजगार लोकांना अद्यापर्यत नोकºया दिल्या नाहीत. याउलट सरकारकडून नोकरी वरून काढले जात आहे. जेव्हापासून भाजप शासन सत्तेत आली तेव्हापासून महागाई वाढत आहे. सिल्डििंरचे दर दुपटीने वाढले आहे. गोड तेलाच्या तेलाच्या किमती, पेट्रोल, डीजलचे दर गगनाला भिडलेले आहेत. या सरकारने गरीब व कष्टकरी लोकांचे जगणे कठिण केले आहे. गरीब, सामान्य लोकांची तिजोरी खाली करून मोठ्या उद्योगपतींना हाताशी धरुन तिजोरी भरण्याचे काम सरकार करीत आहे. गरीब जनतेला एप्रिल फुल बनवीत आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरुध्द तीव्र रोष व्यक्त केला.आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव शिशीर वंजारी, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शहराध्यक्ष सचिन घनमारे, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रेम वनवे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजकुमार मेश्राम, माजी नगरसेवक धनराज साठवणे, अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष अवैश पटेल, महिला काँग्रेस अध्यक्षा भावना शेंडे, युवक अध्यक्ष कमलेश बाहे, विनीत देशपांडे, रिजवान काजी, सुहास गजभिये, पृथ्वी तांडेकर, सुरेश गोन्नाडे, जीवन भजनकर, घनश्याम भांडारकर, बंडू लांबट, अंबादास मंदुरकर, शमीम पठान, भारती लिमजे, पराग खोब्रागडे, सचिन हुमणे, विपुल खोब्रागडे, मयूर गजभिये, इरफान पटेल, मोहिश कुरेशी, निखिल कुंभलकर, प्रवीण भोंदे, मेहमूद खान, शांतनु मोहिते, अमय डोंगरे, विलास मोथरकर, संजय वरगंटीवार, जनार्दन निंबार्ते, रविकुमार येरकडे, घनश्याम भांडारकर, जगदीश कडव, रविंद्र पुडके, रामेश्वर मते, गौतम नागदेवे, नागन खोब्रागडे, दीपक गजभिये, वर्गनाथ गोन्नाडे तसेच शहरातील मजूर वर्ग, बेरोजगार युवक, शहरातील नागरिक, काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.