शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

पालांदूर : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्याच्या मुरमाडी ...

पालांदूर : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्याच्या मुरमाडी तुपकर येथे शनिवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रॅक्टर चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

मन्साराम श्रीराम काळे (३२, रा. मेंढा, भुगाव) असे मृताचे नाव आहे. राजू हेमराज काळे (२५), दीपक दुधराम बारसे (३८) अशी जखमींची नावे आहेत. मुरमाडी तुपकर येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ ट्रॅक्टरने मोटारसायकलला घडक दिली. त्या मोटारसायकलवरील तिघेही खाली कोसळले. मन्साराम यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पीएसआय तेजस सावंत, माधव वनवे घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, रात्री १०.३० पर्यंत कोणताच तोडगा निघाला नव्हता.