शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

मोटारसायकल पुलावरून कोसळली, दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

तुमसर (भंडारा) : भरधाव मोटारसायकल अनियंत्रित होऊन पुलावरून नाल्यात कोसळून दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना तुमसर तालुक्यातील ...

तुमसर (भंडारा) : भरधाव मोटारसायकल अनियंत्रित होऊन पुलावरून नाल्यात कोसळून दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना तुमसर तालुक्यातील खैरलांजी शिवारात बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर रात्रभर दोघेही नाल्यातच पडून राहिले. सुनसान रस्ता असल्याने मदत मिळाली नाही आणि त्यातच त्यांचा प्राण गेला.

समीर राऊत (२२, रा. पिलीनदी नागपूर) आणि संगीत चौधरी (२०, रा. छतेरा - मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मध्य प्रदेशातील छतेरा येथे आजीला भेटण्यासाठी समीर आणि संगीत नागपूरवरून दुचाकीने (एमएच४० बीएस ६०४०) जात होते. मंगळवारी रात्री तुमसर तालुक्यातील खैरलांजी शिवारातील पुलावरून दुचाकी नाल्यात कोसळली. खाली असलेल्या दगडावर दोन्ही तरुण पडले. रस्ता सुनसान असल्याने अपघात झाल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. बुधवारी सकाळी हा अपघात उघडकीस आला. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झालेला होता. अपघाताची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक विलास करंगामी यांनी पंचनामा केला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जुन्या पुलावर कठडा नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.