शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या कुशीपासून दुरावली ‘छकुली’

By admin | Updated: December 25, 2014 23:26 IST

बालपणाचा काळ सुखाचा असे म्हटले जाते. या वयातच मुलांना स्वच्छंदपणे खेळणेबागडणे आवडते. थकलेला बाळ आईच्या कुशीत दडला तर त्याला ऊर्जा मिळते. परंतु, खुटसावरीतील छकुलीच्या

राजू बांते - मोहाडीबालपणाचा काळ सुखाचा असे म्हटले जाते. या वयातच मुलांना स्वच्छंदपणे खेळणेबागडणे आवडते. थकलेला बाळ आईच्या कुशीत दडला तर त्याला ऊर्जा मिळते. परंतु, खुटसावरीतील छकुलीच्या बाबतीत मात्र सगळे उलटेच घडले. दुर्देवी छकुलीचे पितृत्व हरपले अन् आई कारागृहात दृष्कृत्याची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे बालपणीच ती पोरकी झाली आहे.लहानग्या वयात पित्याचे प्रेम आणि आईची कुस मिळावी. मात्र खुटसावरीत छकुलीच्या बाबतीत दुर्देवी घडले. आईच्या दृष्कृत्यामुळे छकुलीसाठी हा काळ वेदनादायी ठरत आहे. आजघडीला ही छकुली मोठ्या आईबाबांकडे पित्याची ममता व आईची कुस शोधत आहे. हे सगळे दुर्देव आले तीन वर्षाच्या छकुली (श्रेया) सरेंद्र धांडे हिच्या नशिबी. पतीचा खून करताना आपले काय होईल. चिमुकल्या छकुलीचे काय होईल. असा थोडासाही विचार प्रीती धांडे या निर्दयी मातेला आला नाही. छकुली गावातीलच एका अंगणवाडीत जाते. आताही ती धास्तावली आहे. मातेच्या या दृष्कृत्यामुळे ती आईचा तिरस्कार करु लागली आहे. सुरेंद्रच्या खूनानंतर छकुलीची आई प्रीती धांडे हिला तपासातील संपूर्ण बारीकसारीक माहिती जाणून घेण्यासाठी खुटसावरीत आणले होते. राहत्या घरी तिला नेण्यात आले. छकुलीला बघून तिचे मन द्रवले. तिला आपल्या कुशीत घेण्यासाठी दोन्ही हात पुढे केले. परंतु, कोण जाणे छकुली आईकडे गेली नाही. काही वेळाने तिला दोन्ही हात मागे घ्यावे लागले. २० दिवसांपासून छकुली मोठ्या आईबाबांकडे राहत आहे. तिचे मोहगावदेवीचे आजोबा नातनीच्या प्रेमापोटी खुटसावरीत आहेत. छकुलीच्या मोठ्या आईबाबांना मुले नाहीत. आता छकुलीच्या रुपात तिला आपली मुलगी बघत आहेत. मोठ्या आईच्या कुशीत बसून तिला आईपेक्षा जास्त प्रेम मिळू लागले आहे. त्यांना अपत्य नसल्यामुळे तेही छकुलीवर जीवापाड प्रेम करीत आहेत. मोठ्या आईला मुलीचे प्रेम मिळू लागले आहे. आता आम्हीच तिचा संपूर्ण सांभाळ करणार असल्याचे छकुलीचे मोठे आईबाबा सांगून आईची सावलीही तिच्यावर पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. छकुलीचे पितृत्व तर कायमचे हरविले. माझ्या बाबांना मारले अशी छकुली सांगते. तीन आठवड्यापासून तिची आई कारागृहात पश्चाताप करीत आहे. या घटनेत प्रिती धांडे हीच मुख्य सुत्रधार होती. हे सर्व करताना आपल्या बाळाचे कसे होईल याचाही तिने विचार केला नाही. छकुलीचा पिता आईनेच हिरावून नेला. आता परत तिचा पिता येणार नाही. मातृत्व देणारे आईबाबा आता तिला मिळाले असतील तरी स्वत:च्या आईच्या कुशीतला विसावा लहान बालकांना सुसह्य करतो. परंतु, छकुलीला आता मोठ्या आईबाबांकडून मिळणार आहे. पितृत्त्व हरपलेल्या मुलांसाठी पुढचे जीवन कसे असह्य होते, याचा प्रत्यय ज्यांना वडील नाहीत त्यांनाच ठाऊक आहे. खुटसावरीत त्या रात्री जे घडले त्याचा परिणाम अख्ख्या गावावर झाला आहे. संपूर्ण गाव आजही दहशतीत आहे. पहाटे आणि रात्रीही कुणी घराबाहेर पडत नाही.