शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मातेने आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:43 IST

भावी पिढी सुदृढ व बलवान करण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध तात्पुरत्या किंवा स्थायी साधनांचा वापर करीत लोकसंख्या नियंत्रण करावे, असे आवाहन कर्मवीर दादासाहेब गायकवाड राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाज सेविका मीरा भट यांनी केले.

ठळक मुद्देमीरा भट : मातृसुरक्षा व लोकसंख्या दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भावी पिढी सुदृढ व बलवान करण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध तात्पुरत्या किंवा स्थायी साधनांचा वापर करीत लोकसंख्या नियंत्रण करावे, असे आवाहन कर्मवीर दादासाहेब गायकवाड राज्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाज सेविका मीरा भट यांनी केले.प्राथमिक आरोग्य केंद्र, लेंडेझरी येथे रुग्ण कल्याण समितीच्या वतीने मातृसुरक्षा व लोकसंख्या दिवस कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले, लेंडेझरी ग्रामपंचायतीच्या सरपंच दुर्गा उईके, गणेशपूर ग्रामपंचायतचे सरपंच मनीष गणवीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीदास लुंगे उपस्थित होते. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष संदीप ताले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सेवांचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्षीय भाषणातून केले. सरपंच दुर्गा उईक यांनी आदिवासी महिलांमध्ये आढळून येणाºया अंधश्रध्दा, व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्यावर भर दिला.सरपंच मनीष गणवीर यांनी शासकीय योजना अंमलबजावणीत लोकसहभाग महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. शांतीदास लुंगे यांनी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजना, मातृवंदन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, जननी शिशू सरक्षा कार्यक्रम इतयादी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते गरोदर व स्तनदा मातांना रक्तवर्धक व आरोग्यदायी औषंधाचे वाटप करण्यात आले. आदिवासी बहुल लेंडेझरी गावातील १२ वी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करणाºया शारदा चौरे व आंचल उईके यांचा भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला. मीरा भट यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. मानव विकास शिबीरात ९१ गरोदर माता व ३९ स्तनदा मातांची ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुधा भूरे यांनी तर शुन्य ते २ वर्षाआतील ४९ बालकांची बालरोगतज्ञ डॉ. आशिष चिंधालोरे यांनी आरोग्य तपासणी करुन औषधोपचार केले.यानिमित्ताने आरोग्य प्रदर्शनी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन आरोगय सहाय्यिक मंगला मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य सेविका ज्योती सार्वे यांनी केले. कार्यक्रमाकरीता डॉ. मेहबूब कुरेशी, गुरुदेव भोंडे, हरकासिंग मडावी, डॉ. प्राची ताले, डॉ. रेशमाराणी बारापात्रे, डॉ. तक्षशिला मेश्राम, डॉ.रश्मी ओहल, डॉ. प्रेषित गिरी,सुनिता पांडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला राजेश्वरी लांजेवार, छाया बर्वे, अंजू लांजेवार, आंचल मेश्राम, दिनकर राठोड, दामू सार्वे, श्रीकृष्ण घटाटे, उषा मेश्राम, भावना वासनिक, उषा चौरे, किशोर आडे, जमनादास जोशी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, लाभार्थी उपस्थित होते.