शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डासांचा प्रादुर्भाव; नगर परिषद उपाययोजना करणार आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:25 IST

नागरिकांची उडतेय रात्रीची झोप : डेंग्यू, मलेरियाचा वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दीड लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात गटार पाइप लाइनचे काम झाल्यानंतर रस्त्यांसोबत नाले, गटारांची दुरवस्था झाली. साफसफाई व केरकचऱ्याची योग्य वेळी विल्हेवाट लावली जात नाही. अस्वच्छ वातावरणामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डासांचे झुंड रक्त पिण्यासाठी दिवस- रात्र घोंघावत आहेत. परिणामी नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. शिवाय डेंग्यू, मलेरिया आदी कीटकजन्य आजाराचा धोका वाढला आहे. नगर परिषद उपाययोजना करणार काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. 

समोर दीड लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता व नाल्यांमध्ये पाणी साचलेले दिसून येते. घरांतून निघालेला केरकचरा रस्त्यांवर टाकला जातो. सडक्या दुर्गंधीमुळे आजारांची भीती बळावली आहे. 

शिवाय नाले, गटारे अस्वच्छ असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या समस्येकडे आरोग्य विभाग व नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे. डासांच्या प्रादुर्भावापासून शहरातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी डासनाशक फवारणी करण्याची मागणी केली जात आहे; पण भंडारा नगर परिषद वेळीच दखल घेणार काय? नागरिकांना भेडसावणारी समस्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करणार काय, असा प्रश्न शहरवासियांकडून विचारला जात आहे.

शहरात डासनाशक फवारणी करा जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने या आजारांची धास्ती बळावली आहे. या सर्व आजारांचे मूळ डास आहेत. डासांपासून शहरवासियांची सुटका व्हावी, यासाठी शहरात डासनाशक फवारणी करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

वृद्ध व बालकांची उडाली झोप डासांचा सर्वाधिक त्रास लहान बालकांना जाणवत आहे. डासांनी चावा घेतलाच बालके खळबळून जागे होता. त्यांच्या रडण्याने दाम्पत्यांची झोप नाहीशी होत आहे. मच्छर अगरबत्ती व अन्य उपायांचा वृद्ध नागरिकांना त्रास जाणवत असल्याने करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावा पुढाकार शहरात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचे स्वास्थ्य सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत वाढवातावरणातील बदलामुळे शहरात डोकेदुखी, तीव्र ताप, अंगदुखी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आजारांचे प्रमाण वाढत असताना आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा