शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

स्वच्छता मॅरेथॉनसाठी वाजला डिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:02 IST

येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर देशाचे सीमेवर शहीद झाले. लष्करी इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पवनी नगरावर शोककळा पसरली होती.

ठळक मुद्देबसपाची मागणी : दु:खद प्रसंगामुळे डिजे वाजविल्याप्रकरणी कारवाई करा

आॅनलाईन लोकमतपवनी : येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर देशाचे सीमेवर शहीद झाले. लष्करी इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पवनी नगरावर शोककळा पसरली होती. दोन दिवस शोकसागरात बुडालेल्या नगर पालिका प्रशासनाने २६ डिसेंबरला स्वच्छता मॅराथॉन दौड आयोजित करून गावात डीजे वाजविला. अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला, या घटनेचा बसपाने निषेध केला आहे.तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनानुसार, २६ ला सकाळी पालिका प्रशासनाने स्वच्छता मॅराथॉन दौड आयोजित केली. आ.अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅराथॉन दौडचा शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. मॅराथॉन दौड सुरु झाल्यानंतर नागरिक व नगरपालिका विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. मॅराथॉन दौडमध्ये डिजेची गरज नसताना रॅलीसोबत नगरात डीजे वाजविण्यात आला. बारा तासापूर्वी ज्यांनी श्रद्धांजली वाहून शहीद मेजर प्रफुल्ल यांचे स्मरणार्थ स्मारक निर्मितीचा संकल्प केला त्यातीलच अधिकारी, पदाधिकारी गावात डिजेच्या तालावर थिरकले. ही बाब नगरवासीयांना संतप्त करणारी होती. स्वच्छता मॅराथॉन दौडचा उद्देश स्वच्छतेची जनजागृती असला तरी डिजेवर थिरकणे हे अशोभनीय असल्याचे म्हटले आहे.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नंदुरकर, राजू गणवीर, जय मेश्राम, अरविंद धारगावे, रमेश मोटघरे, माला समुद्रेकर, सीमा कोचे यांच्यासह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शहीद मेजर प्रफुल मोहरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नगर पालिकेने पुढाकार घेऊन घाटाची स्वच्छता केली. दोन एकरात स्मारक तयार करण्याचा पालिकेने संकल्प केला असून तिथे ई-लायब्ररीपासून सर्व सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे. संपूर्ण देशात स्वच्छता सर्वेक्षण सुरू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम जनजागृतीच्या माध्यमातून राबविण्याचे आदेश आहेत. दु:खद प्रसंगामुळे हा कार्यक्रम चार दिवस पुढे ढकलण्यात येऊन आता राबविण्यात आला. यात चुकीचे काय केले.-माधुरी मडावी,मुख्याधिकारी पवनी.