शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तीन महिन्याची आगाऊ रक्कम भरल्यानंतरही महिन्याभराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रेझरीत रक्कम जमा करण्याची पूर्वीची पद्धत होती. आता स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची रक्कमे ट्रेझरीत जमा करणे व एकाच महिन्याचे धान्याची उचल करून वितरण करावे अशी सूचना आहे. यात दुकानदारांनी तडतोड करून कसेतरी सरासरी ७० ते ७५ हजार रुपये शासन दरबारी जमा केले. मात्र एकच महिन्याचे धान वितरण करण्याचे निर्देश अन्न पुरवठा विभागाने दिले.

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानदार त्रस्त। पुरवठा अधिकारी म्हणतात, उपलब्धतेनुसार धान्य वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : लॉकडाऊनमध्ये शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यासाठी जीव मुठीत ठेवून धान्याची उचल करावी लागत आहे. दुसरीकडे राशन दुकानदारांना पैशांची तडजोड करीत प्रथमच तीन महिन्याचे आगाऊ रक्कम शासन जमा करण्याची वेळ आली . मात्र एका महिन्याचे धान्य वितरीत करण्यात आले. यात मोफत धान्य नाही. यामुळे सामान्य जनता व दुकानदार भरडला जात आहे. याकडे योग्य उपाययोजना करून शासन आदेशाप्रमाणे धान्य वितरीत करण्याची मागणी केली.कोरोनाच्या प्रादूर्भावाने सध्या जगभर हाहाकार पसरलेला आहे. स्वत:ला घरातच लॉकडाऊन करून घेतले आहे. काम नसल्याने खिशात दमडी नाही. अशात स्वस्त धान्य कसे खरेदी करावे, असा प्रश्न लाभार्थ्यांसह स्वस्त राशन दुकानदारांनाही पडला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रेझरीत रक्कम जमा करण्याची पूर्वीची पद्धत होती. आता स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची रक्कमे ट्रेझरीत जमा करणे व एकाच महिन्याचे धान्याची उचल करून वितरण करावे अशी सूचना आहे. यात दुकानदारांनी तडतोड करून कसेतरी सरासरी ७० ते ७५ हजार रुपये शासन दरबारी जमा केले. मात्र एकच महिन्याचे धान वितरण करण्याचे निर्देश अन्न पुरवठा विभागाने दिले.शासनादेशाप्रमाणे दुकानदारांना तीन महिन्याचे मोफत धान्य का दिले नाही असा प्रश्न लाभार्थ्यांनी केला असता त्यांना उत्तर देण्यासाठी नाकीनऊ आले होते.यातच सोशल डिस्टंस पाडणे व लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. महिन्याभराचे स्वस्त धान्य देण्याचे विचारत असल्याने दुकानदारांसह लाभार्थी त्रस्त झाले असून पुन्हा रांगा लाऊन मोफत धान्यासाठी येत आहेत.शिधापत्रिकाधारक संभ्रमातएप्रिल ते जून महिन्यासाठी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त नियतनानुसार तांदळाचा साठा मुक्त करण्याची सूचना भारतीय अन्न महामंडळास स्वतंत्रपणे देण्यात आली. शिधापत्रिकाधारकास रास्तभाव धान्य दुकानामधून तीन महिन्यांचे मोफत धान्य एकत्रित का देण्यात आले नाही येथे प्रश्न आहे. १० ते १५ दिवसानंतर लॉकडाऊन हटल्यास मग धान्य देण्याचे औचित्य काय राहणार?शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे कार्य करीत आहे. धान्यांच्या पुरवठानुसार सध्या महिनाभराचे धान्य वितरीत करण्यात येत आहे. मोफत धान्याचे वाटप १० ते १५ दिवसानंतर करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला धान्याची वितरण करणे गरजेचे आहे.- मिलिंद बंसोडजिल्हा अन्न पुरवठा अधिकारी, भंडारा 

टॅग्स :Socialसामाजिक