शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून रूसला, पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: June 24, 2017 00:25 IST

लहरी निसर्गामुळे शेती बेभरोवशाची व तोट्याची झाली आहे. मान्सूनवरच शेती हंगाम अवलंबून असल्याने शेतकरी दररोजच चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे.

आद्रा नक्षत्रास आरंभ : पेरणीकरिता तयारी पूर्णलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लहरी निसर्गामुळे शेती बेभरोवशाची व तोट्याची झाली आहे. मान्सूनवरच शेती हंगाम अवलंबून असल्याने शेतकरी दररोजच चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे. मात्र मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावल्याने आणखी किती दिवस मान्सून सक्रिय व्हायला वेळ लागेल हे अनिश्चित असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.मागील पाच-दहा वर्षापासून निश्चितच वेळेत मान्सून हजेरी लावतच नाही. हवामान खातेही दररोज नव्या नव्या अभ्यासाच्या आधारे नवेनवे शोध घेतो तरी मात्र हवामान खाते नापास होत आहे. यामुळे शेतकरी सावध पवित्रा घेत पावसाची वास्तवास्थिती बघूनच पेरणीचा निर्णय घेत आहे. आजपर्यंत केवळ पाच ते दहा टक्केच पेरणी आटोपली असून स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतच पेरणी आटोपली आहे. मान्सूनची गती वाढल्यास पेरणीला गती येईल अन्यथा पेरण्या थांबलेल्याच आहेत. शेतकरीही वर्तमानपत्र, दूरदर्शनच्या आधाराने माहिती घेत खरीपाची शेती कसताना दिसत आहे. पुढच्या हप्त्यापासून मान्सून सक्रीय होणार असल्याचे भाकित वर्तवले जात आहे. मान्सून रूसल्याने उष्णता कायम असून पारा ४२ ते ४५ अंशाच्या घरात खेळत आहे.पाऊसच नसल्याने जमिन तहानली आहे. जमिनीला भेगा मोठ्या असल्याने पेरणी शक्य नाही. जमिनीतील तणसुद्धा उगवला नसल्याने पेरणी केलीच नाही. -दुधराम पराते, धान उत्पादक शेतकरी पालांदूर.नर्सरी तयार झाली आहे. परंतु पाऊस अपेक्षित नसल्याने महागाचे बियाणे वाया जाऊ देण्यापेक्षा अपेक्षित पाऊस आल्यावरच पेरणी करायची आहे. कृषिमंडळ कार्यालयातूनही सुचना मिळाल्याने पेरणी थांबली आहे.-कृष्णा जांभुळकर, प्रगत शेतकरी पालांदूर.