शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमयोगी योजनेतून लागणार पैसे बचतीची सवय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:38 IST

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.

ठळक मुद्देरवींद्र्र जगताप : लाभार्थ्यांना मानधन योजनेचे नोंदणी कार्ड वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.केंद्र सरकारच्या वतीने अर्थ संकल्पात ६० वर्ष वयाच्या असंघटीत कामगारांसाठी मासिक तीन हजार रुपए निवृत्ती वेतनाची हमी देणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, हया योजनेचा शुभारंभ मंगळवारला करण्यात जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अवघ्या काही दिवसातच या योजनेसाठी भंडारा जिल्हयात आठ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून ही नोंदणी प्रक्रीया अशीच सुरू ठेवून नागरिकांना पेन्शन मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सीएससी व आपले सरकार सेवा केंद्राचे माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य) मंजूषा ठवकर, प्रवर्तन अधिकारी (भविष्य निर्वाह निधी) अमित आहूजा, संतोष पोळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनिषा कुरसंगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पाच्छापूरे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी नितीन फुके, उप कार्यक्रम व्यवस्थापक खोब्रागडे, आपले सरकार केंद्र (पंचायत) जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले आदींची उपस्थिती होती.जगताप म्हणाले, महिलांमध्ये पैसे बचत करण्याच्या अजूनही विविध पध्दती आहेत, त्या पध्दतीचा फायदा त्यांच्या कुटुंबियांना होतो. परंतु ज्या कामगारांचे पंधरा हजाराचे आत उत्पन्न आहे अशा, असंघटीत कामगारांसाठी अशा प्रकारची योजना नव्हती, परंतु केंद्र शासनाचे पुढाकारातून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही योजना सर्वांना उपयोगी पडेल अशी महत्वाची आहे. ग्रामीण भागात रोजी रोटी करणाऱ्या महिला अजूनही पगार, मजूरी आपल्या नवऱ्याच्या हातात देतात. परंतु कुटूंबात पैसाबाबत एखादी अडचण निर्माण झाली तर त्या पैशाचा मात्र पुरूषांकडे हिशोब नसतो, विविध कामांवर तो खर्च झालेला असतो. अशा वेळी आर्थिक मदतीसाठी कुणीही धावून येत नाहीत, असे अनेक प्रसंग ऐकायला मिळतात. त्यामुळे अशा परिस्थतीत या योजनेचा फायदा कामगारांना बहुमौलाचा ठरणार आहे.