शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

साकोली येथे मुद्रा प्रचार व प्रसार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:46 IST

ग्रामीण भागातील छोट््या उद्योग धंद्याना चालना देण्यासाठी शासनाने मुद्रा योजनेची व्यवस्था ग्रामीण बेरोजगार व्यावसायीकांसाठी केली असुन कर्ज घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वदूर करण्यासाठी प्रचार व प्रसार मेळावे घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन तहसीलदार बी. डी. टेढे यांनी केले.

ठळक मुद्देबेरोजगारांना मार्गदर्शन : बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ग्रामीण भागातील छोट््या उद्योग धंद्याना चालना देण्यासाठी शासनाने मुद्रा योजनेची व्यवस्था ग्रामीण बेरोजगार व्यावसायीकांसाठी केली असुन कर्ज घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वदूर करण्यासाठी प्रचार व प्रसार मेळावे घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन तहसीलदार बी. डी. टेढे यांनी केले.साकोली येथील मंगलमूर्ती सभागृहात आयोजित मुद्रा प्रचार व प्रसार मेळाव्याचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुद्रा समन्वय समितीचे सदस्य राजेश बांते होते, याप्रसंगी अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक आर.एल. खांडेकर, जिल्हा ग्रामीण स्वयरोजगार योजनेचे व्यवस्थापक एन. वाय. सोनकुसरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्ही. पी. तोंडरे, अणासाहेब पाटील महामंडळाचे एल. एल. हुमे, नगराध्यक्ष धनवंता राऊत, नगरसेविका गिता बडोले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. एल. जाधव, व्यवस्थापक कॅनरा बँकेचे एच. एल. चरमार, एसबीआयचे पालीवाल, बँक आॅफ इंडियाचे बोरकर, विदर्भ ग्रामीण कोकण बँकेचे व्ही. जे. बारसे, युनियन बँकेचे यादव आदी उपस्थित होते.तहसीलदार बी. डी. टेढे म्हणाले, शासनाने सुरु केलेल्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगारांनी मुद्रा कर्ज घेवुन व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधावी.राजेश बांते यांनी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून गरीब व आर्थिक दृष्टीने मागासलेल्या बेरोजगार युवकांना रोजगारासाठी मुद्रा कर्ज व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. युवकांनी व्यवसायाचे निश्चित ध्येय ठेवून मृद्रा योजनेतून कर्ज घ्यावे व आपल्या व्यवसायाची प्रगती साधून प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करावी. आपली आर्थिक उन्नती करावी.कार्यक्रमात मुद्रा योजनेतील विविध बँकेतून कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.द्वितीय सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित युवक-युवती बेरोजगारांना मुद्रा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एल. जाधव यांनी तर, संचालन आभार प्रदर्शन सतीश आठवले यांनी केले. मेळाव्यात बहुसंख्येने परिसरातील बेरोजगार, युवक, युवती, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी नागरीक महिला व भगिनी उपस्थित होत्या.