शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:07 IST

सर्वत्र माणुसकी लोप पावल्याची चर्चा होत असताना साकोली येथील नवजीवन कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांनी दाखविलेला माणुसकीचा गहीवर पाहून सर्वच भारावून गेले. कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीच्या वैद्यकीय उपचारासाठी या चिमुकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे गोळा केले. थोडीथोडकी नव्हे, तब्बल ११ हजार ६०० रुपयांची मदत करण्यात आली.

ठळक मुद्देमाणुसकीचा गहीवर : साकोली येथील नवजीवनचे विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सर्वत्र माणुसकी लोप पावल्याची चर्चा होत असताना साकोली येथील नवजीवन कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांनी दाखविलेला माणुसकीचा गहीवर पाहून सर्वच भारावून गेले. कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीच्या वैद्यकीय उपचारासाठी या चिमुकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे गोळा केले. थोडीथोडकी नव्हे, तब्बल ११ हजार ६०० रुपयांची मदत करण्यात आली.साकोली येथील फार्मसी महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. मात्र घरची परिस्थिती साधारण असल्याने तिच्या या आजारावर नियमित खर्च करणे परिवाराला शक्य होत नाही. हा प्रकार नवजीवन कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून कळला. माणुसकीच्या नात्याने विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे गोळा करण्याचे धाडस केले. एकाएका विद्यार्थ्याने थोडेथोडे पैसे गोळा करीत ११ हजार ६०० रुपयांची मदत उभारली. प्राचार्य मुजम्मील सय्यद व उपप्राचार्य पांडूरंग राऊत यांच्या सहकार्याने गौपाले यांच्या उपस्थितीत रासेयोचे समन्वयक निंबेकर यांच्या रक्कम स्वाधीन केली. त्यांनी ती रक्कम कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीस दिली. सामाजिक जाणीवा प्रगल्भ असल्याची अनोळखी व्यक्तीलाही मदतीसाठी सर्वजण धावून जातात. संस्कारक्षम वयात चांगले संस्कार झाले की आदर्श नागरिक व्हायला वेळ लागत नाही. याचाच प्रत्यय नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये आला.या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षकांनी कौतुकाची थाप दिली. या उपक्रमासाठी शर्मीला कच्छवाह, भारती व्यास, सतीष गोटेफोडे, चंद्रकांत भावे, लिना लांजेवार, ममता अंबुले, छबू समरीत, हेमलता कुमार, वंदना घोडीचोर, प्रिती बिसने, अर्चना वाईकर, सोनी शहारे, नेहा गभणे, लता कटरे, विशाखा पशिने, कुमेरचंद घोडीचोर, राजेंद्र मेश्राम, दीपा येळे, अमर आरसोडे, विजया परशुरामकर, धम्मदीप खोब्रागडे, जोशीराम बिसेन, ज्योत्स्ना भांडे, प्रीती हर्षे, सोनाली चौधरी, राशी गुप्ता, झामसिंग येळे, एकनाथ काळसर्पे यांनी सहकार्य केले.शिक्षकांची प्रेरणाकर्करोगग्रस्त विद्यार्थ्याला आर्थिक मदत करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिली. त्यावरुनच विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैेसे गोळा केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचे कार्य नवजीवन कॉन्व्हेंटचे शिक्षक करीत आहेत.