शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील माऊली सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या काळात आपल्या संसाराचा गाडा हाकत तालुक्यातल्या ग्रामीण भागातील माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत. सारे काही ठप्प असताना महाराष्ट्र शासनाची जिवनोन्नोती अभियान 'उमेद'च्या ५३ महिला समूहाच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यास बचत गट महत्त्वाची भूमिका तर बजावत आहेतच शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.

ठळक मुद्देगावागावात जनजागृती : 'उमेद'तर्फे मास्क व सॅनिटायझरची निर्मिती

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना आला आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. केवळ चार तासात चित्र बदलले. आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मास्क, सॅनिटायझरला बाजारात मागणी वाढली. काहींनी तर यामध्ये देखील संधी शोधत काळाबाजारही केला. अव्वाच्या सव्वा भाव लावत आपली झोळी भरायला सुरूवात केली. मात्र मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा चा प्रश्न उभा ठाकला असताना ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील माय माउलींनी मास्क तयार करत कोरोनाच्या या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.लॉकडाऊनच्या काळात आपल्या संसाराचा गाडा हाकत तालुक्यातल्या ग्रामीण भागातील माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत. सारे काही ठप्प असताना महाराष्ट्र शासनाची जिवनोन्नोती अभियान 'उमेद'च्या ५३ महिला समूहाच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यास बचत गट महत्त्वाची भूमिका तर बजावत आहेतच शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळाले आहे. या साº्या घडामोडींमध्ये आणि उलाढालींमध्ये जिल्ह्यात तुमसर तालुका अव्वल ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि त्यानंतर मास्कची कमतरता भासू लागली. पण, या कठीण आणि कसोटीच्या काळात देखील 'उमेद'च्या ५३ समूह महिला सदस्यांनी तब्बल ५७०० मास्क तयार केले, तर ४५० सॅनिटायझरच्या बाटल्या तालुक्यातील सिहोरा परिसरातील सर्व औषधे दुकान, ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून अगदी कमी किमतीत विक्री करण्यात आली आहे. शिवाय, अजूनदेखील हजारो मास्कची गरज असून ते देखील आगामी काळात उमेदच्या माध्यमातून पुरवली जाणार आहे. जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्यात आली असली तरी मेडीकल स्टोर्समध्ये मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. मास्कचा तुटवडा लक्षात घेता नागरिक तोंडावर रुमाल बांधत आहेत. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियाना अंतर्गत त्या माय माऊल्या गावागावांत फिरून रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांनी घ्यावयाची दक्षता व स्वच्छतेविषयी माहिती देण्याचे कार्य पी. टी. बिसेन, महेश बडवाईक, सुरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिला