शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून मोहफुलांची विदर्भात आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:49 IST

विदर्भाच्या सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातून मोहफुलाची खुलेआम आयात होत असून गत डिसेंबर महिन्यात मोठी खेप आल्याची धक्कादायक माहिती आहे. या मोहफुलापासून हातभट्टीची दारु तयार केली जात असून तुमसर तालुक्यात अनेक गावात दारु गाळण्याचे कारखाने आहेत. हा सर्व प्रकार खुलेआम सुरु असतांना कारवाई मात्र केली जात नाही.

ठळक मुद्देहातभट्टीची दारु: डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आली खेप

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विदर्भाच्या सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातून मोहफुलाची खुलेआम आयात होत असून गत डिसेंबर महिन्यात मोठी खेप आल्याची धक्कादायक माहिती आहे. या मोहफुलापासून हातभट्टीची दारु तयार केली जात असून तुमसर तालुक्यात अनेक गावात दारु गाळण्याचे कारखाने आहेत. हा सर्व प्रकार खुलेआम सुरु असतांना कारवाई मात्र केली जात नाही.पुर्व विदर्भातील तुमसर तालुका हा महाराष्ट्राचे शेवटचे टोक आहे. सातपुडा पर्वत रांगांच्या पलीकडे मध्यप्रदेश आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती बालाघाट, वाराशिवनी, कटंगी जंगलात मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे आहेत. मोहफुलाची खेप नियमित भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात पोहचविली जाते. तुमसर तालुक्यात दोन ठिकाणी सीमा लागून आहे. नाकाडोंगरी आणि बपेरा येथील महाराष्ट्राच्या सीमेतून सहज प्रवेश करता येतो. चारचाकी वाहनातून मोहफुलाची खेप याच मार्गाने आणली जाते. सोंड्या पुलावरुन चिखली, देवनारा, अंजनविहिर, सीतेकसा मार्गाने मोहफुल तुमसर तालुक्यात येत आहे.डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागतासाठी मोहफुलाची दारु मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली. ग्रामीण भागात ठिकठिकाणी ही दारु सहज उपलब्ध होती. तुमसर शहरातून तीन किमी अंतरावरील गावात मोहफुल दारुचे मोठे केंद्र आहे. तालुक्यात मोहफुलाची दारु सर्वत्र उपलब्ध आहे. आलेसूर, पिटेसूर सह बावनथडी धरणाच्या वितरीका परिसरात दारु गाळली जाते. ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात दारु गाळण्याचे कारखाने आहेत.मोहफुल आयात करणारी मोठी आंतरराज्यीय यंत्रणा कार्यरत आहेत. मोहफुल व्यवसाय फायद्याची असून मद्यनिर्मितीत मोठा आर्थिक फायदा असल्याचे सांगितले जाते. मध्यमवर्गीय व गरीब मजूर, कामगारांची मोहफुलाच्या दारुला पहिली पसंती असते. स्वस्तात तयार होणारी ही दारु सर्वत्र उपलब्ध असते.मोहफुलाची दारु धोकादायकमोहफुलापासून निर्मित दारुला ग्रामीण भागात हातभट्टीची दारु म्हणून ओळखले जाते. ही दारु तयार करण्यासाठी मोहाचा सडवा तयार केला जातो. त्यात अशुध्द गुळ आणि नवसागर मिसळून उर्ध्वपतन पध्दतीने दारु गाळली जाते. मात्र ही दारु अतिकडक करण्यासाठी त्यात विविध रसायनांचा वापर केला जातो. नवसागर, युरिया सारखी घातक पदार्थ टाकले जातात. त्यासोबतच अनेकदा विषारी द्रावणही टाकूनही दारु कडक केली जाते. पोलीस अशा हातभट्ट्यांवर कारवाई करतात. परंतु आयात होणाऱ्या मोहफुलाकडे मात्र दुर्लक्ष करतात.