शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:57 IST

धान्य वाटप करणारे दुकान बदलविण्यात यावा व अन्य मागणीसाठी आज दुपारी मोरगाव येथील नागरिकांनी मोहाडी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देआदेशावर कारवाई : प्रकरण मोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचे

आॅनलाईन लोकमतमोहाडी : धान्य वाटप करणारे दुकान बदलविण्यात यावा व अन्य मागणीसाठी आज दुपारी मोरगाव येथील नागरिकांनी मोहाडी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. अखेर शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यासाठी तहसिलदार सुर्यकांत पाटील यांनी दुकानदार बदलवून दिले.प्रशासनाने केरोसिन धान्य याच्या साठ्याची चौकशी केली नाही. मोरगाव येथील दुकानदारावर अफरातफरी संबंधी फौजदारी कारवाई झाली. धान्य अफरातफरीची वसुली करण्याचे आदेश झाले. मंत्र्यांनी सुनावणी न घेता सदर धान्य दुकानदाराला स्थगीती दिली. संतप्त झालेल्या मोरगावच्या शिधापत्रिका धारकांनी मनिषा रामटेके यांचेकडून धान्य उचल न करण्याचा निर्णय घेतला.मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार मनिषा रामटेके यांनी धान्य व केरोसीन वाटपात घोटाळा केला. या आरोपावरून मोरगावच्या नागरिकांनी मागील दहा महिन्यापासून निवेदन, मोर्चे, उपोषण असा लढा लढला. अखेर प्रशासन त्या दुकानाची चौकशी करून दुकानदाराला चौकशी अहवालात दोषी ठरविले. धान्य साठ्याची अफरातफरीची वसुली करण्याचे आदेश केवळ तीन वर्षाचे झाले होते. केरोसीन साठ्याची चौकशीच करण्यात आली नाही. एप्रिल २०१२ ते मार्च २०१४ पर्यंत धान्य साठा अफरातफरीची चौकशी झाली नाही. सदर दुकानदारावर २६ लक्ष ८७ हजार धान्य अफरातफरीची वसुली करण्याचे आदेश झाले. मोहाडी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांनी २१ जून २०१७ च्या जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांच्या आदेशाला स्थगिती दिली. या प्रकरणात मंत्र्यांनी सुनावणी घेतली नाही. गावात सदर दुकानदार, प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त होत होता. दुकानदारासाठी स्थगीती आदेश असल्याचा तहसिलदार मोहाडी यांनी पत्र काढला. दुकानदारांनी धान्यसाठा उचल केला. पण दुकानदारांजवळून धान्य उचलायचेच नाही असा निर्णय आॅक्टोबरमध्ये गावकºयांनी घेतला. गावकºयांनी धान्याची उचल करावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले अखेर. गावकºयांच्या एकीपुढे प्रशासनाची काही चालली नाही. झालेल्या चर्चेत, मोरगाव येथील धान्य वाटप सिमा चव्हाण तर महालगावचे धान्य वाटप मनिषा रामटेके करणार आहेत. तहसिलदार यांच्याशी चर्चा निवेदन सरपंच तुलाराम हारगुळे, उपसरपंच बबिता उके, श्रीधर भुते, हिरकन्या हारगुळे, शिल्पा शहारे, सुधाकर बुरडे, गंगाराम भुते, पंढरी अतकरी, अशोक धारगावे, उमेश बुराडे, कैलास हारगुळे, किरण हारगुळे, मोरेश्वर भुते, मधुकर बुरडे, संपत भोयर, दुर्गा ढबाले, मंदा मारबते आदी उपस्थित होते.जिल्हा पुरवठा अधिकाºयांना पाठविले पत्रआंतर दुकान बदलीचा विषय तालुका दक्षता समितीमध्ये २८ आॅक्टोबर रोजी घेण्यात आला होता. समितीचे अध्यक्ष आ. चरण वाघमारे उपस्थित होते. निर्देशानुसार डिसेंबर २०१७ पासून धान्य वाटपाकरिता रास्तभाव दुकानदार महालगावच्या सिमा चव्हाण मोरगावचे धान्य वाटप करणार आहेत तर महालगावचे धान्य मनिषा रामटेके करणार आहेत. याचेपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे तहसिलदार मोहाडी यांनी पत्र पाठविले आहे.