शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत नगराध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Updated: November 22, 2015 00:27 IST

जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तिनही नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर होताच अध्यक्षपदासाठी मोहाडीत मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.

३० ला होणार निवडणूक : चार महिला उमेदवार शर्यतीत सिराज शेख मोहाडीजिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तिनही नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर होताच अध्यक्षपदासाठी मोहाडीत मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. अध्यक्षपदावर कोण विराजमान होतो, हे ३० नोव्हेंबर कळणारच आहे.मोहाडी नगर पंचायत निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच कुणाला अध्यक्ष करणार याकडे लक्ष लागले आहे. ही जागा ओबीसी महिला प्रवर्गाकरिता राखीव असल्यामुळे चुरस वाढली आहे. अध्यक्षपदासाठी रागिणी सेलोकर, स्वाती निमजे, गीता बोकडे आणि कविता बावणे या नगरसेविका शर्यतीत आहेत. प्रत्येकच उमेदवार हे पद आपल्याला मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. पक्षश्रेष्ठीनी या चारही महिलांचा बायोडाटा तयार केला असून यात कोण सर्वश्रेष्ठ ठरतो ते वेळच सांगणार आहे. मात्र उपाध्यक्षपदासाठी सुनिल गिरीपुंजे यांचे एकमेव नाव समोर असल्याने त्यांचे उपध्यक्षपद निश्चित असल्याचे मानले जात आहे. जातीय समिकरणानुसार अध्यक्षपद हलबा कोष्टी समाजाला तर उपाध्यक्षपद ओबीसी समाजाला मिळावे, अशी अपेक्षा असल्यामुळे अध्यक्षपदासाठी स्वाती निमजे व गिता बोकडे या उमेदवारातुन एकाला उमेदवारी दिली जाईल. असंतुष्टांना सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र २६ नोव्हेंबरला ११ ते २ या कालावधीत, छानणी दुपारी २ ते ५ पर्यंत, उमेदवारी मागे घेण्याची तारीख २८ नोव्हेंबर ला चारवाजेपर्यंत तसेच निवडणुक विशेष सभा ३० नोव्हेंबरला ११.३० वाजता निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या उपस्थितीत होणार आहे. ३० नोव्हेंबरला उपाध्यक्षपदाचे नामनिर्देशन दाखल करण्यात येणार असून त्याच सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जातील. नगर पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाकडे आता येथील जनतेचे लक्ष लागलेले असुन आतातरी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.