शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मोहाडी बंद; लाखांदुरात निवेदन

By admin | Updated: August 21, 2016 00:26 IST

पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदार रामचंद्र अवसरे यांना त्वरीत अटक करून न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा,

अवसरे यांच्या अटकेची मागणी : मोहाडीत राविकाँ रस्त्यावरमोहाडी : पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदार रामचंद्र अवसरे यांना त्वरीत अटक करून न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस तालुका मोहाडीतर्फे आज मोहाडी बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे मोहाडी येथील ७० टक्के दुकाने बंद ठेवण्यात आली. गांधी चौकापासून शांतता मोर्चा काढून तहसील कार्यालयात नेण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.भंडाराचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई राजु साठवणे यांना मारहाण केली होती. त्याचा निषेध म्हणून आमदारांना अटक करण्याच्या मागणीसाठी शाळा, महाविद्यालयाला सुटी दिली. गांधी चौक मोहाडी येथून शांतता मोर्चा काढण्यात आला. सात दिवसात आमदार अवसरे यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महासचिव विजय पारधी, शहर अध्यक्ष शोमल गजभिये, विनोद बाभरे, किशोर पातरे, बापु वंजारी, ज्ञानेंद्र आगाशे, मनिष पराते, अफरोज पठाण, बादल गायधने, हितेश साठवणे, हानीश शेख, लकी शेख, नगरसेवक मनिषा गायधने, कौसल्या निखारे, प्रमिला साकुरे, जयश्री गायधने, पप्पु समरीत, महेश पारधी, जितेंद्र आकरे, यश बागडे, शाहरूक शेख, संदेश लोणारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदनलाखांदूर : लाखांदूर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. भारनियमन ताबडतोब बंद करून २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा. इतर मागास वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. वेगळ्या विदर्भाचे राज्य निर्माण करून दिलेली आश्वासन पूर्ण करावे, तिरंगा यात्रेदरम्यान तुमसर येथे १७ आगस्टला भंडाराचे आमदार अवसरे यांनी कर्तव्यातील पोलीस शिपायाला मारहाण केली. त्यामुळे अवसरे यांना अटक करावी, अशा विविध मागण्यासंदर्भात निवेदन सादर करून सोडविण्याची मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, सभापती मंगला बगमारे, उपसभापती वासुदेव तोंडारे, नगरसेवक रामचंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, रामचंद्र परशुरामकर, जयगोपाल लांडगे, नगरसेविका निलिमा हुमाणे, दुर्गा पारधी, निकष दिवटे, ताराचंद मातेरे, मधुकर पारधी, भोजराज राऊत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)