शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी ग्रामीण रुग्णालय 'कोमात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:37 IST

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील ३० हजार जनतेच्या आरोग्य सुधारणेसाठी तयार करण्यात आलेले आधुनिक ग्रामीण रुग्णालय कोमात गेल्याने येथे येणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यात दु:खाचे पाणी येत आहे आणि याला सर्वस्व जबाबदार आरोग्य सेवेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे येथील जनतेला खासगी डॉक्टरांकडे जाऊन भुर्दंड सोसावा लागत आहे.मोहाडी ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील ...

ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : अनेक रुग्णांच्या डोळ्यात आले पाणी

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील ३० हजार जनतेच्या आरोग्य सुधारणेसाठी तयार करण्यात आलेले आधुनिक ग्रामीण रुग्णालय कोमात गेल्याने येथे येणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यात दु:खाचे पाणी येत आहे आणि याला सर्वस्व जबाबदार आरोग्य सेवेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे येथील जनतेला खासगी डॉक्टरांकडे जाऊन भुर्दंड सोसावा लागत आहे.मोहाडी ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील एकमेव आधुनिक चिकित्सालय आहे. मात्र येथे कोणत्याही सेवा नियमित उपलब्ध राहत नाही. ‘रेफर टू भंडारा’ हे एकमेव कार्यक्रम येथे सुरु आहे. सध्या पाऊस व तीव्र उन यामुळे अनेक प्रकारचे आजार बळावले आहेत. प्रत्येक कुटुंबातील किमान एकतरी व्यक्ती आजारी पडलेला आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. या रुग्णालयात होमीओपॅथी, युनानी व आयुर्वेदिक असे तीन नियमित डॉक्टर आहेत. तर एमबीबीएस डॉक्टर दोन आहेत. यापैकी एक डॉक्टर हेडाऊ हे आजारी रजेवर आहेत. दुसरे रुग्णालयाचे अधीक्षक असल्याने त्यांना मिटींगमध्ये जाण्यापासून वेळच मिळत नाही. चार पाच दिवसांपासून येथील वैद्यकीय अधीक्षक नागपूर येथे ट्रेनिंगसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाºयावर कोणाचेही नियंत्रण नाही. कर्मचारी मनमर्जीप्रमाणे रुग्णांसोबत वागत आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेला पाहून सिहोरा येथून एक डॉक्टर प्रतिनियुक्तीवर मोहाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वातावरण बदलामुळे या रुग्णालयात दररोज ३०० च्या जवळपास रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मात्र आवश्यक औषधांचा तुटवडा आहे. सोयी सुविधा अपुºया आहेत. एक्सरे दोनच दिवस सुरु राहतो. शल्य चिकित्सागृह धुळ खात पडला आहे. मधुमेह तपासणी स्ट्रीप उपलब्ध नाहीत. डेंग्यू तपासणी कीट उपलब्ध नाही. पाण्याच्या टाकीत डासांच्या अळ्या पडलेल्या आहेत. अशा अनेक समस्या येथे आहेत. मात्र याकडे लक्ष द्यायला जिल्हा शल्य चिकित्सकाकडे त्यांच्या व्यस्त कामामुळे वेळच नाही. लोकप्रतिनिधीही समस्यांपासून अनभिज्ञ आहेत.ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे प्रतिनियुक्तीवर डॉ.शुभम आकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सध्या ते जास्तच 'फार्म'मध्ये आहेत. संबंधितांना चांगली वागणूक व अनोळखी रुग्णासोबत अरेरावीने वागण्याची पद्धत सुरु केली आहे. येथे येणारे रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील असतात. हे त्यांना चांगले ठाऊक असल्याने ते रुग्णांसोबत भेद करतात. मात्र पूर्वीच आजाराने त्रासलेल्या अशा रुग्णाला पुन्हा या प्रकाराने मानसिक आघात होतो. परिचारिका आपल्या पदनामाप्रमाणे वागत नाहीत.होमियोपॅथी, आयुर्वेदिक औषधी बेपत्ताग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे नियमित आयुर्वेदिक, होमियोपॅथीचे डॉक्टर आहेत. मात्र त्यांची औषधी वर्षभरापासून उपलब्ध नाहीत. आयुष विभागाचे नाव मोठे दर्शन खोटे असा प्रकार आहे. शुद्ध भारतीय चिकित्सा पद्धतीचेच औषधी शासन उपलब्ध करून देत नसल्याने हे डॉक्टर नाईलाजास्तव अ‍ॅलोपॅथीची औषधी रुग्णांना लिहून देतात.