शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत २५ हजार मतदार निवडणार १४१ सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोविड-१९ मुळे पुढे ढकलल्या गेल्या होत्या. १७ ग्रामपंचायती प्रशासकांच्या हातात गेल्या होत्या. आता निवडणुकीचा गावात धुरळा उडणार आहे. यावर्षी गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐन संक्रांतीच्या मोसमात आल्यात. १४ जानेवारी रोजी संक्रांत आहे. १५ जानेवारीला मतदान केले जाणार आहे.  या दोन दिवसांत वाण वाटण्याचा कार्यक्रम होईल. या वाणात उमेदवार महिला व पुरुष उमेदवारांच्या सौभाग्यवती महिलांच्या पदरात कोणतं वाण द्यायचे हे ठरवतीलच.

ठळक मुद्दे७७ महिला सदस्य, सरपंच पदाची लॉटरी कुणाला?

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींचा हा ट्रेलर आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या  सत्तेची चावी आपणाकडे राहावी यासाठी गावपुढाऱ्यांची लढाई सुरू झाली आहे. मोहाडी तालुक्यात सतरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. ५२ प्रभागांतून १४१ सदस्यांना निवडून द्यायचं आहे. २५ हजार ११२ मतदारांच्या हातात १४१ सदस्यांचे भाग्य आहे.  १४१ सदस्यांपैकी ७७ महिला सदस्य निवडून द्यायच्या आहेत.  १७ ग्रामपंचायतींमध्ये १२ हजार ४०२ महिला मतदार व १२ हजार ७१० पुरुष मतदार आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोविड-१९ मुळे पुढे ढकलल्या गेल्या होत्या. १७ ग्रामपंचायती प्रशासकांच्या हातात गेल्या होत्या. आता निवडणुकीचा गावात धुरळा उडणार आहे. यावर्षी गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐन संक्रांतीच्या मोसमात आल्यात. १४ जानेवारी रोजी संक्रांत आहे. १५ जानेवारीला मतदान केले जाणार आहे.  या दोन दिवसांत वाण वाटण्याचा कार्यक्रम होईल. या वाणात उमेदवार महिला व पुरुष उमेदवारांच्या सौभाग्यवती महिलांच्या पदरात कोणतं वाण द्यायचे हे ठरवतीलच.  यामुळे महिला मतदारांची संक्रांत नक्कीच गोड होणार आहे. मात्र, मतदान झाल्यानंतर कोणत्या महिला व पुरुष उमेदवारांची संक्रांत गोड - कडू होणार हे दिसणार आहे. तीळगूळ घ्या - गोडगोड बोला असं संक्रांत सणाला म्हटलं जाते. पण, मतदानानंतरच मतमोजणीच्या दिवशी पराजित झालेल्यांना तिळांच गोड लाडू चविष्ट वाटणार नाही. मोहाडी तालुक्यातील या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकींवर राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांची बारीक नजर राहणार आहे. कारण या निवडणुका पुढील जिल्हा परिषद,  पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुकीवर प्रभाव पाडणार आहेत. सध्या आघाडीचे शासन आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त ताण सत्ता पक्षातील नेत्यांना अधिक राहणार आहे. गावातील सत्ता पक्षात असणारे गावपुढारी व तालुक्यातील नेते यांच्यात किती समन्वय आहे यावर विजयाचे गणित ठरणार आहे. मोहाडी तालुक्यात विरोधी पक्षात विचार, गटांची दरी आहे; पण एक विरोधी गट प्रबळ आहे. याचा सामना सत्ता पक्षाचे तालुक्यातील नेते कसा करतात याचे चित्र पुढील पंधरवड्यात स्पष्ट होणार आहे. गावपुढारी यांनी निवडणुकीची जबाबदारी आपल्या हातात घेतली;  पण सरपंच पदाचे आरक्षण काढले गेले नाही. त्यामुळे काहीसा उत्साहात कमतरता असली. उत्सवात असणारी हीच उणीव परिणाम करणारी ठरणार आहे. सरपंच पदाचे  आरक्षण काहीही येवो. त्यासाठी निवडणूक गांभीर्याने घेतली गेली, तसेच  सर्व आयुधे वापर केला गेला, तरच सत्ता पक्ष असो की विरोधी पक्षाच्या नेत्यांना निवडणूक आपल्याकडे वळविता येणार आहे. 

तीन गावांत महिला मतदार अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ५० टक्के महिलांचे पद आरक्षित आहेत; पण प्रत्यक्षात महिला सदस्यांचे आरक्षण ५४.६० टक्के आहे. १७ ग्रामपंचायतींमधील ग्रामपंचायत पिंपळगाव झंझाड, केसलवाडा लेंडेझरी व दहेगाव येथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अनुक्रमे १८, १ आणि ६ मतांनी अधिक आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक