शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

मोबाईलधारकांनी ‘लोटा’ सोडावा

By admin | Updated: March 15, 2017 00:21 IST

शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे.

सुधाकर आडे : देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी साधला संवादभंडारा : शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. परंतु त्याच हातात ग्रामीण भागात उघडयावर शौचास जाण्यासाठी टमरेलचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी केले. तुमसर तालुक्यातील देव्हाडी ग्रामपंचायत येथे हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सरपंच रिता मसरके, ग्राम विकास अधिकारी व्ही. बी. बावनकुळे, उपसरपंच विरेंद्र दमाहे, सदस्य सुधीर मसरके, संजय बिरनवारे, मुकेश मुटकूरे, रंजना नागपूरे, आशा दमाहे, इंदू लिल्हारे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, रोजगारसेवक किरण दमाहे, आशा सेविका लिना बघोले, आॅपरेटर सुनिल लिल्हारे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आडे यांनी, तालुक्यात इतर गावांपेक्षा देव्हाडीची आदर्श म्हणून वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्याकरिता विचारसरणी स्विकारावी लागेल. मोबाईलच्या द्वारे जगाला हातात धरण्याची क्षमता ज्या नागरिकांच्या हातात आहे, त्याच हातात टमरेल दिसून येणे हे मानवांसाठी दुर्देवाची बाब आहे. गावातील उघड्या हागणदारीचे चित्र नाहिसे करणे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. जिवनात एखाद्या शब्दानेही बदल घडविता येते परंतु तो शब्द मानवांच्या अंतकरणाला भिडला पाहिजे. त्याकरिता सामजिक दबाव महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला समाज जिवन घडविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ते घडविता येवू शकते. नागरिकांना मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कुटुंबाशी जुळावे लागेल. संवाद साधून संधीचे सोने करावे लागेल असे सांगितले व २० मार्च २०१७ पर्यंत वॉर्ड व गाव हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम गावाबाबतची शौचालय बांधकामाची स्थिती जाणून घेतली व सदस्य, वॉर्ड, दिवस निहाय नियोजन करून ग्रामपंचायत सदस्यांनी अंमलबजावणी करावी व उघड्या हागणदारीचे समुह उच्चाटन करावे, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रश्न विचारुन शंकांचे निरसन केले. हागणदारीमुक्त गाव करून तुमसर तालुक्यात देव्हाडीची वेगळी ओळख निर्माण करण्याचे अभिवचन यावेळी उपस्थितांनी दिले. (शहर प्रतिनिधी)