शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल डिजीटल स्कूल’मध्ये जिल्हा राज्यात अव्वल

By admin | Updated: April 1, 2016 01:05 IST

शालेय शिक्षण क्रीडा विभाग मुंबई अंतर्गत सीएसआरद्वारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयांतर्गत मिशन मोबाईल डिजीटल ...

भंडारा : शालेय शिक्षण क्रीडा विभाग मुंबई अंतर्गत सीएसआरद्वारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयांतर्गत मिशन मोबाईल डिजीटल स्कूलमध्ये राज्यातून भंडारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या उपलब्धीने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या आशयाची घोषणा शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काल केली. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (मुंबई), महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट), शिक्षण विभाग व हेमंत सेलिब्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंशत: सीएसआरद्वारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निर्णयांतर्गत ‘मिशन मोबाईल डिजीटल स्कूल’ कार्यशाळा ३० मार्चला घेण्यात आली. यावेळी शिक्षण आयुक्त डॉ. भापकर यांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे भंडारा जिल्ह्याने ‘मिशन मोबाईल डिजीटल स्कूल’ अंतर्गत १०० टक्के जिल्हा प्रगत शाळेत मोबाईलचा वापर अध्ययन साहित्य म्हणून करण्यात येण्यात यशस्वी ठरल्याचे सांगून भंडारा जिल्हा राज्यातून अव्वल आल्याची घोषणा केली. यावेळी मंचावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयसिंह परिहार, उपशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, गटशिक्षणाधिकारी एस. एच. तिडके, तत्वराज अंबादे, रमेश गाढवे, रमेश सिंगनजुडे, मुबारक सैयद, जयंत उपाध्ये, शिक्षक समितीचे पदाधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते. या मिशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येकी एक शिक्षकाला कार्यशाळेला पाचारण करण्यात आले होते. यात जिल्हाभरातून ७७८ शिक्षकांनी हजेरी लावली होती. देवानंद घरत व जीत बुंदेले या सुलभकांच्या मदतीने शिक्षकांना मोबाईल एक अध्ययन साहित्याचे तांत्रिक कौशल्य देण्यात आले. यावेळी शिक्षकांनी भंडारा जिल्हा १०० टक्के मोबाईल स्कूल झाले असे आवाजी पध्दतीने एक मताने सांगितले. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका प्रथम व जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याचा क्रमांक प्रथम आला आहे. यावेळी कार्यशाळेंतर्गत सीडीचे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यशाळेसाठी गटशिक्षणाधिकारी सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)