शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदार राहूनही विकास बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:03 IST

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार जसे आहे तसे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही भाजपचे आमदार, खासदार आले.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : माजी आमदार अनिल बावनकरांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

आॅनलाईन लोकमततुमसर : केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार जसे आहे तसे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही भाजपचे आमदार, खासदार आले. परंतु तीन ते साडेतीन वर्षाचा कालखंड लोटला तरी विकास कुठेच दिसून आला नाही. तर त्याकरिता राजकीय ईच्छाशक्ती असणे आवश्यक असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले.येथील अग्रेसन भवनात आयोजित तुमसर शहर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, राजेंद्र जैन, धनंजय दलाल, नाना पंचबुद्धे, मधुकर सांभारे, विठ्ठल कहालकर, अभिषेक कारेमोरे, कल्याणी भुरे उपस्थित होते.यावेळी पटेल म्हणाले, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात सत्ता हस्तगत केली. व आता त्यांचे सत्य बाहेर पडत आहे. शेतकºयांच्या ज्यावेळी राज्यात व केंद्रात आघाडीचे सरकार होते त्यावेळी धानाला तीन हजार रूपये भाव मिळायचा व आता त्याच धानाला दोन हजारपेक्षाही कमी भाव मिळत आहे. दोन वर्षापुर्वी नितीन गडकरी यांनी विकासाच्या नावावर जिल्ह्यात पाच हजार ५०० कोटीच्या कार्याचे भूमिपूजन केले होते. ते कामे कुठे दिसत नाही. भाजप फसवी सरकार आहे हे जनतेला कळले आहे. त्यामुळे जनताच त्यांना जागा दाखविणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार अनिल बावनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल पटेल यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. यावेळी बावनकर यांचे तुमसर, मोहाडी तालुक्यातील शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रकाश गजभिये, अनिल बावनकर, मधुकर कुकडे, कल्याणी भुरे, अभिषेक कारेमोरे यांनी संबोधीत केले.