शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-जि. प. सदस्य यांच्या वादात रखडले रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:31 IST

या रस्त्याचे काम आमचे. त्या रस्त्याचे काम तुमचे, या आमदार व जिल्हा परिषद सदस्यातील वादात सावरी-...

कामे ठप्प : प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातजवाहरनगर : या रस्त्याचे काम आमचे. त्या रस्त्याचे काम तुमचे, या आमदार व जिल्हा परिषद सदस्यातील वादात सावरी-जवाहरनगर परिसरातील ग्रामीण रस्ते रखडले आहेत. परिणामी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. जनतेची कामे जलदगतीने व्हावे, या हेतूने परिसरातील जनतेनी लोकप्रतिनिधी निवडले. परंतु जिल्हा परिषद शाळा पेवठा येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमातंर्गत कार्यक्रमाच्या समारोपात हा मुद्दा समोर आला. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले, पेवठा-कोंढी हा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आम्हाला रस्ता बांधकामासाठी एनओसी देत नसल्याचे बोलून टाकले.आमचा पैसा आम्हीच वापरू, आमच्याकडे रस्ते तयार करणारी यंत्रणा आहे. तशी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नाही. जिल्हा परिषदेनी तयार केलेले रस्ते ही दीर्घकाळ टिकावू नाही वा वेळेच्या आत काम पूर्ण करीत नाही. आता जनताच ठरविणार रस्ता कोणाचा चांगला असतो, असे सांगितले. मागीलवेळी जिल्हा परिषदेवर भाजपा सेनेची सत्ता होती. त्या काळात तत्कालीन सभापती चरण वाघमारे यांनी दोन गावांना जोडणारे रस्ते व ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते अर्थात ओडीआर व व्हीआर हे रस्ते जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम मालकीचे आहेत. हक्काचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यात चरण वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला होता. (वार्ताहर)जिल्हा परिषदेतही सार्वजनिक बांधकाम खाते आहे. आमच्याकडे यंत्रणा असून आम्ही रस्ते तयार करू शकतो. ३०-५४ व ५०-५४ चा हक्क आमचा आहे. हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोंढी ते जिल्ह्याची सीमा गोवरी, कारखाना ते लोहारा, पेवठा ते कोंढी रस्ता मंजूर आहे. मात्र आमदार आम्हाला आमच्या हक्काचा पैसा देत नाही. ९ कोटी रूपये जिल्हाधिकारी दालनात पडून आहे.- प्रेमदास वनवे,जि.प. सदस्य, सावरी जवाहरनगर.