शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईच्या मागणीसाठी निघालेले आमदार नरेंद्र भोंडेकर पोलिसांच्या ताब्यात

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: March 31, 2024 17:53 IST

शेकडो सेवकांसह निघाले होते मोहाडीकडे : मार्गात पोलिसांनी अडविले. परमात्मा एक सेवक उतरले रस्त्यावर : शास्त्री यांच्या तात्काळ अटकेची मागणी.

भंडारा : मोहाडी येथे सुरू असलेल्या प्रवचनादरम्यान बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनी सलग दोन दिवस मानव सेवा धर्माविरूद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा आणि तातडीने अटक करा, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येतील सेवकांनी रविवारी दुपारी मोहाडीकडे कूच केले. त्यांच्यासोबत निघालेले आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अन्य सेवकांना पोलिसांनी वाटेतच अडवून ताब्यात घेतले.

दरम्यान, मोहाडी पोलिस स्टेशनवर हजारांवर सेवकांचा जमाव पोहचला असून धीरेंद्र शास्त्री महाराजांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. 

दोन दिवसांपूर्वी प्रवचन सोहळ्यात धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी धार्मिक प्रवचनादरम्यान मानवता सेवा धर्माविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करून मोहाडी पोलिसात तक्रार तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारच्या प्रवचनात महाराजांनी पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे बराच क्षोभ पसरला आहे. प्रवचन स्थळी पोलिस बंदोबस्ततणावाची स्थिती लक्षात घेऊन मोहाडीतील प्रवचन स्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. प्रवचनस्थळी धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक जमलेले आहे. तर मोहाडी पोलिस ठाण्यात तसेच चौकात सेवकांची मोठी गर्दी आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक लोहीत मतानी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन घटनास्थळी आहेत.  हा तर आचारसंहितेचा भंग : आमदार भोंडेकरनिवडणूक काळात धार्मिक विवाद उत्पन्न होईल, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तरीही धीरेंद्र शास्त्री हे सामाजिक तेढ पसरविणारे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवून अटक करावी. या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी मोहाडीला निघण्यापूर्वी पत्रकार परिषदेतून केली.

टॅग्स :bhandara-acभंडारा