शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

आमदारांनी ठोकले जिल्हा पणन कार्यालयाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

जिल्ह्यात ७३ आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. गोदामाच्या अभावाने खरेदी मंदावली आहे. परिणामी शेतकºयांना आपला धान उघड्यावरच ठेवावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आधारभूत केंद्रावर शेकडो क्विंटल धान उघड्यावर आहे. गत आठ दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. या पावसात खरेदी केंद्रावरील धान ओले होवून शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देखरेदी केंद्रावर अव्यवस्था : जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत धान खरेदी केंद्रावरील अव्यवस्थेचा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पावसात शेकडो क्विंटल धान ओले झाले. यानंतरही प्रशासन गंभीरतेने घेण्यास तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शुक्रवारी दुपारी येथील जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.जिल्ह्यात ७३ आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. गोदामाच्या अभावाने खरेदी मंदावली आहे. परिणामी शेतकºयांना आपला धान उघड्यावरच ठेवावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आधारभूत केंद्रावर शेकडो क्विंटल धान उघड्यावर आहे. गत आठ दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. या पावसात खरेदी केंद्रावरील धान ओले होवून शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विशेष म्हणजे धान खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी हे निर्देश गंभीरतेने घेतले नाही. जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसून केंद्रावरील धान ओले झाले. शेतकऱ्यांनी आपली आपबीती आमदार नरेंद्र भोंडेकर यांना सांगितली.शुक्रवारी दुपारी ३ वाजता अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्या समर्थकांसह जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात धडकले. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु कुणीही समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार भोेंडेकर यांनी चक्क कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी अनिल गायधने, बाळू फुलबांधे, विजय काटेखाये, प्रकाश मेश्राम, मुकेश थोटे, राजू ब्राम्हणकर, नरेश बावनकर, नरेश उचिबगले, नामदेव सुरकर, राजेश सार्वे, यशवंत पंचबुद्धे, पुरूषोत्तम टेंभरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरखधंदाअधिकारी आणि व्यापारी मिळून शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरधंदा करीत असल्याचा आरोप आमदार भोंडेकर यांनी घेतला आहे. सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची दुरावस्था होत आहे. शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.