शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजांची विनारॉयल्टी वाहतुकदारांवर होणार कारवाई

By admin | Updated: December 25, 2016 00:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : विभागीय कारवाईला जावे लागेल सामोरे

भंडारा : गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार ( रेती ) जड वाहतूक करणारे वाहने व ट्रॅक्टर/ट्रेलर यांच्यावर विभागीय कार्यवाही करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार (रेती)जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कलम ८६ अंतर्गत विभागीय कारवाई करुन गुन्हा क्र.१ नुसार ३० दिवस परवाना निलंबन तर गुन्हा क्र.२ नुसार ६० दिवसासाठी परवाना निलंबन व गुन्हा क्र.३ नुसार परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ५३ नुसार कारवाई करुन अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार (रेती) वाहतूक करणाऱ्या परिवहनेत्तर वाहनांवर कारवाई करण्यात येऊन गुन्हा क्र.१ नुसार वाहनाची ३० दिवसाकरीता नोंदणी निलंबन तर गुन्हा क्र.२ नुसार ६० दिवसाची वाहन नोंदणी निलंबन व, गुन्हा क्र.३ नुसार वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येईल. मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम २१ अंतर्गत अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार ( रेती ) विना परवाना तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाच्या अनुज्ञप्तीवर कारवाई अंतर्गत गुन्हा क्र.१ नुसार ३० दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तर गुन्हा क्र.२ नुसार ६० दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलबंन व गुन्हा क्र.३ नुसार ९० दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अवैध गौण खनिजाची विना रॉयल्टी व अधिक भार (रेती) विना परवाना परिवहन व परिवहनेत्तर तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुध्द पोलीस विभाग तसेच महसूल विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे कळविण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ८६ तसेच कलम ५३ व २१ नुसार कारवाई करतील. रेती वाहतूक करणाऱ्या चालक व मालकांनी आपल्या वाहनातून अवैध विना रॉयल्टी व क्षमतेपेक्षा अधिक भार ( रेती ) विना परवाना मोटार वाहनातून करु नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)