लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना तुमसर तालुक्यातील मेहगाव येथे घडली. आरोपी युवकाला तुमसर पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध विनयभंग तथा अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.आशिष सुरेश राणे (२४) रा.मेहगाव असे आरोपीचे नाव आहे. आशिष राणे याची गावातीलच एका मुलीशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमप्रकरण सुरु असतानाच आपण सोबत राहू, लग्न करू असे आमिष दाखवून तिच्याशी अनेकदा संबंध प्रस्थापित केले. मुलीच्या घरी याबाबत माहिती झाली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी आशिषला लग्न लग्न करण्यास सांगितले. मात्र आरोपी आशिषने त्यास नकार दिला.त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तुमसर पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी केली. तक्रार नोंदवून घेतली.भादंवि कलम ३६४, २ अॅट्रासिटी अंतर्गत आशिष राणे याच्यावर तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी करीत आहेत.
मेहगाव येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:20 IST