शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांचा पळून जाण्याचा बेत फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:50 IST

नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले.

ठळक मुद्देभुरळ मायानगरीची : रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने मुलं सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. मुंबईत जाऊन मोठे होण्याच्या बालिश प्रकार रेल्वे पोलिसांच्या चौकस नजरेने हेरले व त्याच्या चौकशी दरम्यान त्यांचे बिंग फुटले. पुन: एकदा रेल्वे सुरक्षा दलाला घरून पळून जाणाऱ्या मुलांना वाचवण्यात यश आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने दोन्ही मुलांचे आयुष्य वाचले.कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी येथील सक्षम नामदेव मोहरकर व समीर रामेश्वर मारवाडे हे गावातील बुटी विद्यालयात ९ व्या वर्गात शिकतात. नियमित शाळेत जाणे व अभ्यासासाठी पालकांनी तगादा लावल्याने त्रस्त झाले. शाळेतही खूप काही अभ्यासात जमत नसल्याने शाळेत त्यांचा मन रमत नव्हते. दोन्ही मित्र असल्याने त्यांनी घरून पळून जाण्याचा बेत आखला. यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. मायानगरीचे आकर्षणाने ते ग्रासले होते. टीव्ही च्या माध्यमातून त्यांना मायानगरीची ओढ निर्माण झाली. मुंबईसारख्या शहरात जाऊन सहज मोठा होता येते हि समज ठेवून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी तयारी केली.मुंबईला जाण्यासाठी लागणारे पैसे गोळा झाल्यावर त्यांनी शाळेतून पळ काढला. शाळेच्या कपड्यावर गावापासून भंडारा रोड रेल्वे स्टेशन असा प्रवास आॅटो रिक्षाने केले. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकस नजरेत पडले. शाळेचा ड्रेस आणि सोबत कुणीही सोबती नसल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबद पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना तत्काळ माहिती दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक विनेक मेश्राम यांनी मुलांना चौकशी करिता ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करताना सदर बालके घरून पळून आल्याचे निदर्शनास आले.दरम्यान पोलिसांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोकुन धरले. याबाबद खमारीच्या मुख्याध्यापकाशी संपर्क करून पालकांना कळवण्यात आले. मूल घरून पळून घेल्याचे धक्याने पालकांनी तत्काळ भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. दरम्यान मुलाची ओळख पटल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पालकाच्या स्वाधीन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. एच. शेंडे., पोलीसउपनिरीक्षक जय सिंग, भूपेश देशमुख व पंकज कुमार उपस्थित होते.