शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील ग्राम पंचायतींना किमान वेतनाचे वाटप

By admin | Updated: February 28, 2015 00:50 IST

तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे किमान वेतनाचा अनुदान निधी वळता करताना तांत्रिक अडचणी आल्याने विलंब झाला असता.

दणका लोकमतचाचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे किमान वेतनाचा अनुदान निधी वळता करताना तांत्रिक अडचणी आल्याने विलंब झाला असता. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत ९७ ग्रामपंचायतकडे १८ लाख रूपयाचा निधी वळता करण्यात आलेला आहे.तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये १५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना राज्य शासन ५० टक्के आणि ग्रामपंचायत ५० टक्के किमान वेतन देत आहे. यात राहनीमान भत्ता आणि भविष्य निर्वाह निधी यांचा समावेश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना ७२०० रूपये असे महिन्याला किमान वेतन देण्यात येत आहे. गावात अल्पशा मानधनावर कर्मचारी १८ तास सेवा देत आहेत. ही सेवा देताना वेळ निश्चित नाही. रात्री शासकीय आणि गैरशासकीय कार्यक्रमाचे आयोजन असताना हेच कर्मचारी अखेरपर्यंत सेवा देत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी न्यायासाठी भांडत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांचे वेतन आणि समस्याचे गाऱ्हाणे कुणी ऐकत नाही. राहणी भत्ता या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे. गावात वास्तव्य करित असताना हा भत्ता वेळेवर प्राप्त होत नाही. जे गावात वास्तव्य करित नाही, असे कर्मचारी बोगस राशीची उचल करित आहेत. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देताना शासकीय यंत्रणा हयगय करीत आहे. दरम्यान सन २०१३-१४ या सत्राच्या कालावधीत ज्या ग्राम पंचायतीने ८० टक्के करांची वसुली तथा लोकवस्ती ० ते ५ हजार पर्यंत आहे, अशा गावांना १०० टक्के अनुदान राशी वाटपाचे निकष शासन स्तरावर लागू करण्यात आले असताना किमान वेतन वाटपाचे १८ लाख रूपये तुमसर पंचायत समितीला आॅक्टोंबर २०१४ ला वाटप झाले. परंतु तांत्रिक अडचणी आल्याने हा निधी ग्रामपंचायतकडे वळता करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)