शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाचा वीज पुरवठा दिवसभर गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:14 IST

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषदेत गुरुवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओव्हरलोडमुळे शॉर्ट सर्किट होऊन भडका उडाला. सुदैवाने एका कर्मचाºयाने वेळीच प्रसंगावधान साधून आगीवर नियंत्रण मिळविले.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे भडका : प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषदेत गुरुवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओव्हरलोडमुळे शॉर्ट सर्किट होऊन भडका उडाला. सुदैवाने एका कर्मचाºयाने वेळीच प्रसंगावधान साधून आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.जिल्हा परिषदेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची दहा दिवसातील ही दुसरी घटना होय. जिल्हा परिषदेत जवळपास १७ पेक्षा अधिक विभाग असून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यात अजून वाढ झाली आहे. त्यातच नवीन इमारतींमध्ये एसी लावल्यामुळे त्याचा भार ही जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत असलेल्या विद्युत पुरवठ्यावर देण्यात आला आहे. अचानक मोठा स्फोट झाल्याने कर्मचाऱ्यांसह आलेल्या नागरिकांनी विजेचे मीटर लागलेल्या भागाकडे धाव घेतली. यावेळी एमसीबी जवळील केबल जळत होता. याचवेळी एका कर्मचाºयाने अग्नीशमन यंत्र (सिलिंडर)च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. उन्हाळ्याचे दिवस असून वारंवार अशा प्रकार घडत असतानाही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत.नवीन डीपीचा प्रस्ताव रखडलाजिल्हा परिषदेच्या कामाची व्याप्ती मोठी असल्याने इमारतीला लागणाºया विद्युत पुरवठ्यातही वाढ करण्याची गरज लक्षात घेता, त्यासाठी स्वतंत्र डीपी लावण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात नवीन डीपी बसविण्याबाबत निधी मंजूर असून टेंडरींगच्या कामात विलंब होत असल्याने नवीन डीपी बसविण्यासाठी वेळ लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना व निधी मंजूर झालेला असतानाही प्रक्रिया का अडविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दोनवर्षांपूर्वी झाले होते केबलचे अपडेशनजिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील पश्चिम दिशेकडील भागात विजेचे केबल व मीटस बसविण्यात आले आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मिटरची व एमसीबीची व्यवस्था आहे. मात्र गरजेपेक्षा पुरवठा कमी व लोड येत असल्यामुळे वारंवार स्फोट होऊन आग लागण्याची घटना घडत आहेत. जवळपास दोन वर्षांपुर्वी जिल्हा परिषदेतील विद्युत पुरवठ्याच्या केबलचे अपडेशन करण्यात आले होते. त्यानंतरही अशा घटना घडल्या आहेत.

टॅग्स :electricityवीज