शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

मिनी मंत्रालयाने आतापर्यंत अनुभवला १७ अध्यक्षांचा कारभार

By admin | Updated: June 20, 2015 01:11 IST

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेने आतापर्यंत १७ अध्यक्ष पाहिले आहेत.

इंद्रपाल कटकवार भंडाराजिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेने आतापर्यंत १७ अध्यक्ष पाहिले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतच्या अध्यक्षांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्हा वेगळा झाल्यावर आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर सात जणांना अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. भंडारा जिल्हा परिषदेत एकूण ५२ सदस्य आहेत. यात सर्वात प्रथम अध्यक्ष होण्याचा मान के. डी. ठाकूर यांना मिळाला. सन १९६२ - १९७१ पर्यंत सलग ९ वर्ष अध्यक्षपदावर कायम होते. यानंतर १६ आॅगस्ट १९७१ ते ११ आॅगस्ट १९७२ पर्यंत जी. एच. अग्रवाल अध्यक्ष बनले. १२ आॅगस्ट १९७२ ते २९ डिसेंबर १९७६ पर्यंत व्ही. सी. दुबे हे अध्यक्ष राहिले. १९ जानेवारी १९७७ ते १९ जून १९७९ पर्यंत बी. एल. पटले अध्यक्ष पदावर विराजमान होते. यानंतर राधेश्याम अग्रवाल हे २० जून १९७९ ते १८ फेब्रुवारी १९८७, बी. जे. नागभिरे हे १३ आॅगस्ट १९८७ ते ३० जून १९९०, टोलसिंग पवार हे २१ मार्च १९९२ ते २० मार्च १९९७, शिशुपाल पटले हे २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८, श्रीमती किसनाबाई भानारकर हे २१ मार्च १९९८ ते २० मार्च १९९९, शिवलाल गावडकर हे २१ मार्च १९९९ ते ३० एप्रिल १९९९ हे अध्यक्षपदी होते. शिशुपाल पटले हे सन २००४ मध्ये खासदार झाले होते.सन १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा वेगळा झाला. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा पहिला मान वामिना तरोणे यांना लाभला. त्या १५ जुलै २००० ते १४ जानेवारी २००३ पर्यंत अध्यक्ष होत्या. यानंतर चुन्नीलाल ठवकर हे १५ जानेवारी २००३ ते १४ जुलै २००५, मनोहर सिंगनजुडे हे १५ जुलै २००५ ते १४ जानेवारी २००८, सुमेध श्यामकुंवर हे १५ जानेवारी २००८ ते २२ जुलै २००९, राजकुमार मेश्राम हे १२ आॅगस्ट २००९ ते १४ जुलै २०१०, अ‍ॅड. वसंत एंचिलवार हे १५ जुलै २०१० ते १४ जानेवारी २०१३ त्यानंतर विद्यमान अध्यक्ष वंदना वंजारी या १५ जानेवारी २०१३ पासून कार्यरत आहेत.